Home मनोरंजन डान्स करत असताना अचानक पळून गेली राखी सावंत, व्हिडीओ होतोय व्हायरल

डान्स करत असताना अचानक पळून गेली राखी सावंत, व्हिडीओ होतोय व्हायरल

0
डान्स करत असताना अचानक पळून गेली राखी सावंत, व्हिडीओ होतोय व्हायरल

[ad_1]

हायलाइट्स:

  • बिग बॉस १४ फेम राखी सावंत सोशल मीडियावर नेहमीच असते चर्चेत
  • आताही सोशल मीडियावर व्हायरल होतोय राखी सावंतचा धम्माल डान्स व्हिडीओ
  • डान्स करताना अचानक पळून गेली राखी सावंत, सोशल मीडियावर होतेय चर्चा

मुंबई: बिग बॉस फेम राखी सावंत कधीही आणि कुठेही आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करण्याची संधी सोडत नाही. ती एक अशी सेलिब्रेटी आहे जी कोणत्याही गोष्टीत मनोरंजन शोधू शकते. काही दिवसांपूर्वीच राखीचा ‘तेरे ड्रीम मे मेरी एंट्री’ हा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. याशिवाय अनेकदा तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आताही तिचा असाच एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात डान्स करत असताना अचानक राखी पळून जाताना दिसतेय.

ड्रामा क्वीन राखी सावंत नुकतीच मुंबईमध्ये स्पॉट झाली. ज्यावेळी अचानक पॅपराजी समोर ‘Appadi Podu’ हे गाणं गात तिनं डान्स करायला सुरुवात केली. पण डान्स करता करता तिनं असं काही केलं की, तिला स्वतःच्या वागण्याची लाज वाटली आहे आणि ती अचानक पळून गेली. राखी सावंतचा हा व्हिडीओ प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.


राखी सावंतच्या या व्हिडीओवर तिचे चाहते जोरदार कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी तिच्या या व्हिडीओचं कौतुक केलं आहे. तिचा हा मजेदार डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. एकीकडे चाहते राखीचं कौतुक करत असताना स्वतः राखीनंही विरल भयानी यांच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. ‘मला हे काय होतं कधी-कधी’ असं तिनं आपल्या कमेंटमध्ये म्हटलं आहे.

AssignmentImage-1735433084-1626167411

राखी सावंतनं ‘बिग बॉस १४’मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतली होती. आपल्या धम्माल कॉमेडीनं हा सीझन गाजवणाऱ्या राखीनं या सीझनमध्ये अंतिम ५ स्पर्धकांमध्येही स्थान मिळवलं होतं. या शोमधून राखीला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. त्यानंतर राखीनं काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पुन्हा एंट्री करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच ती इंडियन आयडलच्या मंचावरही दिसली होती.



[ad_2]

Source link