Home ताज्या बातम्या डिमसम, बाओ, सुशी ‘या’ दक्षिण आशियाई पदार्थांची चव एकदा नक्की चाखा!

डिमसम, बाओ, सुशी ‘या’ दक्षिण आशियाई पदार्थांची चव एकदा नक्की चाखा!

0

कशात काहीतरी भरून खाणे माणसाला नेहमी आवडते. आपल्या भारतातच नाही तर पूर्ण जगभरात असे स्टफ केलेले पदार्थ आवडीने खाल्ले जातात. म्हणून तर हल्ली रोल्स, रॅप्स, श्वारमा, पराठे असे पदार्थ लोकांच्या सोयीचे असल्याने लोकप्रिय झाले आहेत. त्यातलेच काही म्हणजे डिमसम/ डम्पलींग, मोमो हे पदार्थ. तांदूळ पीठ/मैदा यांच्या आवरणात असंख्य प्रकारचे मांस, भाज्या, भरून उकडवून हे पदार्थ खाल्ले जातात. खास करून दक्षिण पूर्व आशियाई देशात. आपण जशी चकली, बाकरवडी उभ्या उभ्या खातो. तसेच हे पदार्थ. तेलाचा वापर अजिबातच नाही, क रायचा खटाटोप नाही आणि मुख्य म्हणजे सुटसुटीत यामुळे हे पदार्थ चटकन आपलेसे होत आहेत. हे पदार्थ स्टाटर म्हणूही आजकाल दिले जातात. फिटनेसफ्रिक लोकांच्या हे पदार्थ अतिशय आवडीचे असल्याचे शेफ परिमल सावंत यांनी सांगितले. तेल, तूप काहीही नाही, फक्त उकडलेले पदार्थ. त्यामुळे फॅट वाढण्याची चिंताच नाही. त्यामुळे हे पदार्थ लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. महत्वाचे म्हणजे हे पदार्थ मूळ मांसाहारीच आहेत. पण लोकांनी त्यात आपल्या सोयीनुसार शाकाहारी पर्याय निर्माण केले आहेत आणि तेही लोकप्रिय होत असल्याचे सावंत यांनी सांगितले.

डिमसम

मोमोज आणि डिमसम करण्याची पद्धत अगदी सारखी. फक्त त्यांची नाव आणि प्रकार वेगवेगळे असतात. मुळ चीनचे असलेले हे डिमसम तिथे नॉनव्हेजच्या वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. पण डिमसमचा मूळ रंग हा पांढराच. तांदळाच्या पिठीपासून पारी बनवून त्यात आवडीप्रमाणे मश्रूम, कोबी, गाजर वगैरे भाज्या स्टफ करून त्या केळीच्या पानावर मोदक करतो त्याप्रमाणे वेताच्या डिमसम पात्रात उकडवले जातात. ते चॉपस्टॉकनेच किकॉमोन सॉस, जिंजर ऑनियन सॉसबरोबर खातात. आता डिमसम निळ्या, लाल, गुलाबी, अश्या विविध रंगात मिळतात याशिवयी शेफ परिमलना विचारल्यावर ते म्हणाले मूळ डिमसम हे पांढऱ्या रंगाचेच असतात. लोकांना एट्रेक्ट करण्यासाठी भाज्यांचे रंग वापरून त्या त्या रंगाचे डिमसम केले जातात.

बावो

हा चायनिज पावाचा स्टफ प्रकार. यातही भाज्या भरून बावो उकडवला जातो. आणि सॉसबरोबर खाल्ला जातो. बावो मुळचा गोल आकाराचा असतो. पण मुंबईत काही ठिकाणी अर्धगोल आकाराचा मध्ये भरलेली भाजी दिसेल असा मिळतो. परिस्थितीनुसार यात वेगळेपणा आणला जातो.

मोमोज

मुळचे तिबेटी असलेले मोमोज कसे करायचे हे आता वेगळं सांगायची गरज नाही. आता ते सर्रास सगळीकडे मिळतात.आणि घरीही केले जातात. महत्वाचे म्हणजे मूळ मोमोज हे उकडवूनच खाल्ले जातात. फ्राईड मोमोज हा प्रकार मुळात नाहीच. डिमसममध्ये पॅन फ्राईड डिमसम असतात. पण ते पूर्ण न तळता फक्त त्याच्या खालचा भाग ग्रील केला जातो. म्हणजे वरून खाताना उकडलेले आणि खाली क्रिस्पी असे ते खाता येतात.

सुशी

 हा जपानमधला कोल्ड फ्लेटरचा प्रकार आहे. तुम्ही जर फोटोत सुशी पाहिली असेल तर मेंहदी रंगाकडे झुकणारी हिरवी पट्टी दिसते आणि त्याच्या आत भात, अर्धवट शिजवलेल्या रंगीत भाज्या दिसतात. या सुशीचे माकी, कुरामाकी, सशिमा असे प्रकार असतात. पण करायची पद्धत मात्र सारखीच. ती जी हिरवी शीट असते ती समुद्रातल्या तळातलं गवत काढून त्याला सुकवले (डिहायड्रेड) केले जाते. पण त्याच्या शीट्स बनतात. त़्या शीट्स वर आपल्याकडच्या उकड्या तांदूळासारखा जो तांदूळ असतो तो उकडवताना त्याचा रोल झाला पाहिजे इतपत स्टिकी उकडवतात. त्यानंतर तो भात थोडासा पसरवात. त्यात प्रामुख्याने नॉनव्हेज स्टफ केले जाते. पण गाजर,एस्पेंजर, झुकीनी, आवोकाडो अश्या काही भाज्या चिरून, उकडवून त्याही घालता येतात. हे सगळंं घातलं की ते रोल करायचं. त्यात इतर कोणतेही चटकदार मसाले घातले जात नाही. यासुशी बरोबर बाजूला पिकल जिंजर म्हणजे गुलाबी रंगाच्या आल्याचे तुकडे, किकोमान सोया सॉस, हिरव्या रंगाच्या तिखट वसाबी सॉस दिला जातो. सुशी किकोमान सॉसमध्ये बुडवूनच खायची. मध्येच अगदी थोडासा वसाबी सॉस (प्रचंड तिखट असतो.) आणि आल्याचा तुकडा खायचा. तरच खायला मजा येते. याबाबत शेफ परिमल सावंत म्हणाले की, स्टेटस सिंबोल म्हणून तर लोकं आवर्जून आता सुशी खात आहेत. पण जे लोकं रोज मसालेदार जेवतात त्यांना सुशी थोडी ब्लंट वाटू शकते.

वॉन्टोन – याच्या शीट्स फॉनिकल शेपमध्ये बनवतात. हे करण्याची पद्धत डीमसम सारखीच. पण ते स्टफ केलेले शेप सूपमध्ये टाकून खातात. तर डंपलिंगमध्ये नॉनव्हेजचा वापर प्रामुख्याने केला जातो. तस ग्योझा पातळ शीट्सचा वापर करून केले जातात.