Home बातम्या राष्ट्रीय डिलीट झालेले Whatsapp मेसेज वाचता येणार, जाणून घ्या कसं

डिलीट झालेले Whatsapp मेसेज वाचता येणार, जाणून घ्या कसं

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. फोटो, व्हिडीओ पाठवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर होतो. व्हॉट्सअ‍ॅप देखील आपल्या युजर्ससाठी सातत्याने नननवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपवर सातत्याने मेसेज येत असतात. मात्र त्यातील काही मेसेज हे डिलीट केले जातात. हे डिलीट केलेल मेसेज वाचता येत नाहीत. पण काही ट्रिक्सचा वापर केल्यास हे मेसेज युजर्सना वाचता येतात. 

व्हॉट्सअ‍ॅपवर जे मेसेज डिलीट केले जातात ते फोनमध्ये स्टोर होतात. अ‍ॅपच्या रिकव्हरी फीचरच्या मदतीने हे मेसेज रिकव्हर केले जातात. चॅट हिस्ट्री ही व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व्हरवर स्टोर नसते. चॅट मेसेजचा बॅकअप असतो. तसेच ते वेगवेगळ्या ठिकाणी स्टोर केले जातात. जर चुकून रिसीव्ह केलेला मेसेज डिलीट केला तर तो सहजपणे व्हॉट्सअ‍ॅपच्या चॅट बॅकअप पर्यायमध्ये रिकव्हर केला जाऊ शकतो. 

व्हॉट्सअ‍ॅप दररोज, आठवड्यांनी आणि महिन्यांच्या हिशोबाने लोकल डिव्हाईस बॅकअप क्रिएट करतो. जर तुम्ही डेली बॅकअप अ‍ॅक्टिव्हेट केलं असेल तर व्हॉट्सअ‍ॅप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा. त्यानंतर लॉग इन प्रोसेस फॉलो करा. रिस्टोर बॅकअप मेसेज ऑप्शनवर क्लिक करा. मात्र प्रत्येक वेळीच अशा पद्धतीने डिलीट केलेले मेसेज मिळतील असं नाही. 

जर एखाद्या सेंडरने पाठवलेला मेसेज डिलीट फॉर एव्हरीवन ऑप्शनने डिलीट केला असेल तर तो मेसेज देखील वाचता येतो. त्यासाठी थर्ड पार्टी अ‍ॅपची गरज आहे. थर्ड पार्टी अ‍ॅप नोटीफिकेशन्स आणि रिसीव्ह झालेल्या मेसेजचा डेटा ठेवतात. गुगल स्टोरवर असे अनेक अ‍ॅप उपलब्ध आहेत ज्याच्या मदतीने डिलीट केलेले मेसेज वाचता येतील. मात्र अशा प्रकारे डिलीट केलेले मेसेज वाचण्याची पद्धत ही धोकादायक ठरू शकते. 

whatsapp quock edit media shortcut feature for android and ios | Whatsapp वर नवीन फीचर येणार, फोटो झटपट एडिट आणि फॉरवर्ड होणार 

Whatsapp वर नवीन फीचर येणार, फोटो झटपट एडिट आणि फॉरवर्ड होणार 

व्हॉट्सअ‍ॅप फोटो झटपट एडिट आणि फॉरवर्ड करण्यासाठी एक नवीन फीचर आणणार आहे. ‘क्विक एडिट मीडिया शॉर्टकट’ असं या फीचरचं नाव असून यामध्ये फोटो एडिट करता येणार आहे. विशेष म्हणजे युजर्सना रिसीव्ह सेंड करण्यात आलेले फोटो लगेचच एडिट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार ‘क्विक एडिट मीडिया शॉर्टकट’ हे फीचर पर्सनल आणि ग्रुप चॅटवर देखील काम करणार आहे. रिसीव्ह केलेला एखादा फोटो एडिट करून पुढे फॉरवर्ड करणं आता अधिक सोपं होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अपडेटमध्ये फोटो एडिट करण्याचा एक पर्याय मिळणार आहे. टेक्स्ट अ‍ॅड करण्यासोबतच इमेजसाठी डुडल आणि कॅप्शनपण यामुळे देता येणार आहे. एडिट करण्यात आलेला फोटो फोनमध्ये सेव्ह होणार नसून केवळ ओरिजनल फोटो सेव्ह होणार असल्याची माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. 

WhatsApp स्टेटसला फेसबुक स्टोरी बनवायचंय? मग ‘या’ स्टेप्स करतील मदत 

WhatsApp मेसेजचा कंटाळा आलाय? अकाऊंट डिलीट न करता व्हा ‘Invisible’

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. नातेवाईक, मित्रमैत्रिणी, ऑफिसमधील सहकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर असंख्य ग्रुप केलेले असतात. मात्र अनेकदा ग्रुपवर सातत्याने येणाऱ्या मेसेजचा कंटाळा येतो. ट्विटर, फेसबुक, स्नॅपचॅटसारख्या प्लॅटफॉर्मवर लॉग आउट करण्याचा एक पर्याय देण्यात आलेला असतो. व्हॉट्सअ‍ॅप हे स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्शन सुरू असेपर्यंत चालू असते. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपपासून काही वेळ लांब जाण्याचा विचार केला तर त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट बंद करावं लागत अथवा अ‍ॅप डिलीट करावे लागते. मात्र आता या गोष्टी करायची गरज नाही कारण व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटींग्समध्ये थोडे बदल केल्यास युजर्स त्यांना हवा तितका वेळ व्हॉट्सअ‍ॅपवरून गायब होऊ शकतात. 

WhatsApp वर असं अ‍ॅक्टिव्ह करा डार्क मोड फीचर 

WhatsApp वर ‘ही’ ट्रिक वापरून खास मेसेज करा सेव्ह

WhatsApp आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. ग्रुपमध्ये सातत्याने अनेक मेसेज येत असतात. तसेच आपल्या मित्रमैत्रिणांकडून मेसेज येत असतात. पण नवीन मेसेज आल्यावर जुने मेसेज मागे जातात. त्यातील महत्त्वाचे अथवा खास मेसेज हवे असल्यास स्क्रिनशॉट्स काढले जातात. मात्र आता असं करण्याची गरज नाही कारण व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक असं फीचर आहे ज्याच्या मदतीने युजर्स महत्त्वाच्या मेसेजला बुकमार्क देऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅपवर प्रायव्हेट आणि ग्रुप चॅट अशा दोन्ही ठिकाणी ही फीचर उपलब्ध आहे. याच्या मदतीने युजर्स कोणताही मेसेज सहजपणे दोन वेळा अ‍ॅक्सेस करू शकतात. स्टार मेसेज या नावाने  व्हॉट्सअ‍ॅपवरच हे फीचर ओळखलं जातं. विंडो (Windows), अ‍ॅन्ड्रॉईड (Android) आणि आयओएस (iOS) तीनही प्लॅटफॉर्मवर हे फीचर उपलब्ध आहे.