नवी दिल्ली : दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी सहाय्यक डीएसपी दविंदरसिंग यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी बरखास्त केले आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, दविंदरसिंग यांना निलंबित करण्यात आले आहे, त्यांच्या बरखास्तीची शिफारस सरकारकडे करण्यात आली असेही ते म्हणाले.
डीजीपी सिंह म्हणाले की, दविंदरसिंग यांची चौकशी केली जाईल, या प्रकरणात जे सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आवश्यक असल्यास, संसद हल्ल्याच्या प्रकरणाचीही चौकशी केली जाईल. दविंदरसिंग यांच्या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे हस्तांतरित करण्याची शिफारस केली आहे.
दविंदरसिंग यांच्या निवासस्थानाची चौथ्या दिवशीही पोलिसांनी झाडाझडती घेतली. सिंह यांना हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
- Advertisement -