Home ताज्या बातम्या डी मार्ट मॉलच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरली

डी मार्ट मॉलच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरली

0

डी मार्ट मॉलच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरली

चिंचवड येथील डी मार्ट मॉलच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 23 ऑगस्ट रोजी दुपारी चिंचवड येथे घडली.

कैलास शंकर धराडे (वय 30, रा. दापोडी, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास फिर्यादी धराडे चिंचवड येथील डी मार्ट येथे खरेदी करण्यासाठी आले. त्यांनी त्यांची एम एच 14 / जी बी 4815 ही ‍‍12 हजार रुपयांची दुचाकी डी मार्ट मॉलच्या पार्किंगमध्ये उभी केली. ते खरेदी करून परत आले असता त्यांची दुचाकी चोरी झाल्याचे समोर आले. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.