Home शहरे मुंबई डॉक्टरांची मानहानी; हास्यकलाकार सुनील पालविरुद्ध गुन्हा दाखल

डॉक्टरांची मानहानी; हास्यकलाकार सुनील पालविरुद्ध गुन्हा दाखल

0
डॉक्टरांची मानहानी; हास्यकलाकार सुनील पालविरुद्ध गुन्हा दाखल

[ad_1]

म. टा. खास प्रतिनिधी
मुंबई : करोना संकटात जीवाची बाजी लावून रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये रुग्णांची दिवसरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांवर हास्यकलाकार याने बेफाम आरोप केले आहे. त्याने फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या या व्हिडीओची दखल घेत असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या डॉक्टरांच्या संघटनेने पोलिसांत धाव घेतली आहे. अंधेरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हास्यकलाकार सुनील पाल सध्या फेसबुकच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतो. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ प्रसारित करतो. एका वाहिनीशी साधलेल्या संवादाचा व्हिडीओ सुनील पाल याले नुकताच प्रसारित केला. यामध्ये करोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांविषयी अनेक आक्षेपार्ह विधाने केली व त्यांच्या कामावर आरोप करीत संशय व्यक्त केला. डॉक्टरांसाठी काम करणाऱ्या असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हा व्हिडीओ निदर्शनास आला. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सुमारे १२ हजार आणि ८००पेक्षा अधिक रुग्णालयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संस्थेने अंधेरी पोलिसांकडे लेखी तक्रार केली.

संघटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी हिंदी भाषेतील या व्हिडीओची प्राथमिक तपासणी केली. व्हिडीओमध्ये करोना काळात डॉक्टर हे एखाद्या सैतानाप्रमाणे वागत आहेत. काहीही लक्षणे नसताना रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला जातो. ते स्वतःच्या रुग्णालयात दाखल करतात आणि भरमसाठ बिल फाडतात. अशा प्रकारे अनेक आरोप करीत सुनील पाल याने डॉक्टरांवर टीका केली आहे. संघटनेच्या लेखी तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी भादंवि कलम ५०० (अब्रुनुकसानी) आणि कलम ५०५ (२) (सार्वजनिक द्वेषभाव निर्माण करणारी विधाने) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

[ad_2]

Source link