Home ताज्या बातम्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शास्त्र विद्यापीठाला सर्वार्थाने अग्रेसर ठेवण्यासाठी अमुलाग्र बदल करणार : कुलगुरू डॉ. वेदाला रामा शास्त्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शास्त्र विद्यापीठाला सर्वार्थाने अग्रेसर ठेवण्यासाठी अमुलाग्र बदल करणार : कुलगुरू डॉ. वेदाला रामा शास्त्री

बोरघर ( माणगांव ) : विश्वास गायकवाड

संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्य व रायगड जिल्ह्याचे आणि माणगांव तालुक्याची आन बान आणि शान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शास्त्र विद्यापीठाचा आपल्या संपूर्ण देशासह सर्व जगाला हेवा वाटावा आणि शैक्षणिक क्षेत्रात त्याचा कायम दबदबा निर्माण व्हावा या प्रामाणिक निःस्वार्थी मनस्वी भावनेतून या विद्यापिठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. वेदाला रामा शास्त्री यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शास्त्र विद्यापिठाशी संबंधित प्रशासकीय, शैक्षणिक, संशोधनात्मक, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यापिठाच्या शैक्षणिक वृद्धी करीता उपलब्ध असलेल्या वास्तूचे सुशोभीकरण आणि व्याप्ती व वृद्धीकरणा संदर्भातील महत्त्वाचे धोरणात्मक अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मनोनिग्रहणात्मक निर्धार केला आहे. या करीता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी विद्यापिठाच्या विकासात्मक निर्णयावर चर्चात्मक संवाद साधून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या पत्रकार परिषदेस स्वतः विद्यमान कुलगुरू डॉ. वेदाला रामा शास्त्री आणि त्यांचे सहकारी व रायगड प्रेस क्लब संलग्न माणगांव प्रेस क्लब चे विद्यमान अध्यक्ष श्री. गौतम जाधव, कार्याध्यक्ष श्री. पद्माकर उभारे, उपाध्यक्ष श्री. विश्वास गायकवाड सहसचिव श्री. हरेश मोरे, प्रसिद्धी प्रमुख श्री. गिरीश गोरेगांवकर तसेच अन्य पत्रकार संघटनेचे पदाधिकारी श्री. कमलाकर ओव्हाल, श्री. सलीम शेख, श्री. मजिद हाजिते, श्री. प्रमोद मोहिरे, श्री. केदार खुले आणि श्री. अजेश नाडकर इत्यादी पत्रकार उपस्थित होते. या पत्रकार परिषदेस उपस्थित पत्रकार आणि सदर विद्यापिठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. वेदाला रामा शास्त्री यांच्या सर्वस्पर्शी चर्चात्मक संवादाने सदर ( प्रेस काॅन्फरन्स ) तथा पत्रकार परिषद संपन्न झाली.