हायलाइट्स:
- अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती आणि निर्माता-दिग्दर्शक राज कौशल यांचे निधन
- पती निधनाचे दुःख सोसत मंदिरा बेदीने पाळला पत्नीधर्म
- राज कौशल यांच्या पार्थिवाला दिला खांदा
राज कौशल यांच्या शेवटच्या प्रवासाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राज यांना अॅम्ब्युलन्समधून दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. त्यावेळी मंदिराने देखील राज यांच्या पार्थिवाला खांदा दिला. मंदिराला दुःख अनावर झाले होते, मात्र त्यानंतरही तिने आपल्या पत्नीधर्माचे पालन केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला असून सर्वचजण तो पाहून भावुक झाले आहेत.
जेव्हा राज यांना मुखाग्नी देण्यात आला तेव्हा मंदिरा सातत्याने रडत होती. यावेळी मंदिराचे अनेक मित्रमंडळी आणि बॉलिवूडमधील कलाकार उपस्थित होते. स्मशानात येण्याआधी राज यांचे पार्थिव अॅम्ब्युलन्समध्ये ठेवले जात होते, तेव्हा मंदिराला दुःखावेग आवरत नव्हता. त्यावेळी रोनित रॉयने तिला सावरले.
राज आणि मंदिरा हे एक आदर्श कपल होते. त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. दोघांनी एकमेकांना काही वर्षे डेट केल्यानंतर १९९९ मध्ये लग्न केले. त्यानंतर या दोघांना वीर हा मुलगा झाला. त्यानंतर गेल्याचवर्षी जुलै महिन्यात राज आणि मंदिराने तारा या मुलीला दत्तक घेतले होते. ताराच्या येण्याने हे चौकोनी कुटुंब आनंदी झाले. ताराच्या येण्यामुळे राज तर खूपच आनंदी झाले होते. राज सातत्याने तारासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचे.
रविवारी मित्रांसोबत केली शेवटची पार्टी
राज आणि मंदिरा यांनी त्यांच्या काही मित्रांसोबत रविवारी जंगी पार्टी केली होती. या पार्टीमधील काही फोटो राज यांनी सोशल मीडियावर शेअरही केले होते. परंतु राज यांची ही अखेरची पार्टी असेल असं कोणालाही वाटलं नाही.