Home गुन्हा ढालेगाव परिसरातुन वाहतुक करतांना महसूलच्या पथकाची कारवाई

ढालेगाव परिसरातुन वाहतुक करतांना महसूलच्या पथकाची कारवाई

0

वाळूची अवैध वाहतुक करणारे एक ट्रॅक्टर पकडले,ढालेगाव परिसरातुन वाहतुक करतांना महसूलच्या पथकाची कारवाई


वाळूची अवैध वाहतुक करणारे एक ट्रॅक्टर पकडले

पाथरी(लक्ष्मण उजागरे):जिल्ह्यात वाळु वाहतुकीला बंदी असतांना अवैधपणे वाळु वाहतुक करणारे एक ट्रॅक्टर आज महसूल विभागाच्या पथकाने पकडले. या कारवाईमुळे अवैध वाळु वाहतुक करणार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात वाळु उपशाला बंदी आहे. तसेच वाळु घाटांची लिलाव प्रक्रिया देखिल झालेली नाही. त्यामुळे पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथुन गोदावरी नदीपात्रातुन मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैधरित्या उपसा केला जात आहे. थेट नदीमध्ये ट्रॅक्टर उतरवून वाळुची चोरटी वाहतुक केली जात आहे. या अवैध वाळु वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी महसुल विभागाने पथके कार्यान्वीत केली आहेत.

advertisement
advertisement

आज (११)पहाटे शनिवार रोजी ४:३० दरम्यान महसुली विभागाचे पथक गस्त घालत होते. या गस्ती दरम्यान ढालेगाव परिसरातुन अवैध वाळु वाहतुक करणारे ढालेगाव येथील अमोल विक्रम शिंदे यांचे विना नंबरचे ट्रॅक्टर या पथकाने पकडले.हे ट्रॅक्टर पुढील कार्यवाहीसाठी पाथरी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.ढालेगाव परिसरातुन ही अवैध वाळू वाहतुक केली जात आहे. प्रांताधिकारी व्ही.एल.कोळी व तहसीलदार अश्विनकुमार बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी पि.एन.गोवांदे व तलाठी सचिन शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कारवाई सुरूच राहणार – अश्विनकुमार बिरादार
अवैध वाळु वाहतुकीच्या अनेक तक्रारी येत असल्याने पथकांना गस्त घालण्याचे आदेश दिले आहे. अवैध वाळु वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पथकाकडुन नियमीतपणे कारवाई केली जात आहे. जप्त केलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई देखिल केली जात आहे. लिलाव होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे.

advertisement