Home गुन्हा तडीपारी मध्ये गुन्हे केलेला आरोपी युनिट 1 गुन्हे शाखा पुणे शहर यांच्याकडून जेरबंद

तडीपारी मध्ये गुन्हे केलेला आरोपी युनिट 1 गुन्हे शाखा पुणे शहर यांच्याकडून जेरबंद

0

परवेज शेख दि.25/1/2020 फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेणे कामी वरिष्ठांकडून आदेश दिल्याने, आज रोज

युनिट १, गुन्हे शाखेचे पोलीस उप-निरीक्षक उत्तम बुदगुडे, पोलीस कर्मचारी संजय बरकडे, सचिन जाधव ,इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, मल्लिकार्जुन स्वामी, व गजानन सोनुने, असे युनिट १ चे हद्दीमध्ये पेट्रोलिंग

करीत असताना पोलीस नाईक सचिन जाधव यांना बातमी मिळाली कि – फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर येथील तडीपार केलेला रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे रुपेश राजेंद्र गायकवाड हा मंगळवार पेठ वजनकाटा त्याच्या घरा जवळ सार्वजनिक रोडवर उभा आहे.


सदरची बातमी वरिष्ठांना कळवून त्यांनी आदेश दिले बाबत युनिट 1 स्टाफने सापळा रचून बातमीतील इसमास पकडले आहे. त्याचे बाबत खात्री करता त्याचे नाव पत्ता – रुपेश राजेंद्र गायकवाड वय 23 वर्षे. , मंगळवार पेठ पुणे. त्याचे कडे अधिक चौकशी करता व माहिती घेता .

तो शिवाजीनगर पो स्टे, पुणे शहर गु र नं 443/ 2019 भा द वि क. 141,144,147,148,149,268,427, भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) मध्ये मागील 03 महिन्यापासून पासून फरार आहे.
२) फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर गु र नं 376/ 2019 भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) मध्ये मागील 04 महिन्यापासून पासून फरार आहे.

सदरची कामगिरी श्री अशोक मोराळे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त गुन्हे शिवाजी पवार ,सह पोलीस आयुक्त गुन्हे प्रतिबंधक यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरुण वायकर, पोउपनि उत्तम बुडगुडे, हनुमंत शिंदे ,पोलीस कर्मचारी सचिन जाधव, श्रीकांत वाघोवले, इरफान मोमीन ,योगेश जगताप, वैभव स्वामी, गजानन सोनुने व संजय बरकडे यांनी केली आहे.