Home ताज्या बातम्या तडीपार गुंडास जेरबंद शाखा युनिट-3 ची कामगिरी

तडीपार गुंडास जेरबंद शाखा युनिट-3 ची कामगिरी

0

पुणे : परवेज शेख तडीपार  गुंडास जेरबंद शाखा युनिट-3 ची कामगिरी तडीपार गुन्हेगार संजय शंकर गोखले यास गुन्हे शाखा युनिट ३ ने केले जेरबंद मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी समुळ नष्ट व्हावी व गुन्हेगारावर वचक बसावा म्हणून अभिलेखावरील फरार व पाहिजे आरोपी तसेच तडीपार इसम यांचा शोध घेऊन त्याचे विरुध्द कठोर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. त्यानुसार पोलीस कारवाई करीत आहेत.

दिनांक – १५/११/२०१९ रोजी स.पो.फौजदार अनिल शिंदे,पो.शि.७६२१ सालुंके व पो.शि.७४२५ रावळ असे सिंहगडरोड पोलीस स्टेशनचे हददीत पेट्रोलींग फिरत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार संजय शंकर गोखले वय ३२ वर्ष रा. गल्ली नं ३ हॅपी कॉलनी कोथरूड पुणे हा बालाजी अपार्टमेंट धायरी गारमाळा पुणे येथे आलेला आहे. त्यानुसार गुन्हेशाखा युनिट-३ कडील वरील स्टाफने त्यास ताब्यात घेतले

गुन्हेगार संजय गोखले यास मा.पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ३ पुणे यांनी दिनांक १७.०५.२०१९ रोजी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातुन ६ महिन्याकरीता हद्दपार केले आहे. त्याचे विरूध्द पुणे शहरात दरोडा,जबरीचोरी, आर्म अॅक्ट, खुनाचा प्रयत्न असे एकुण ९ गुन्हे दाखल आहेत. त्याचे विरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर ६८८/२०१९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व त्यास सिंहगडरोड पोलीस ठाणेकडे हस्तांतर करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री.अशोक मोराळे, मा.पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे श्री. संभाजी कदम, मा.सहा.पोलीस आयुक्त, प्रतिबंधक डॉ.शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.राजेन्द्र मोकाशी, सहा.पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, सहा.पोलीस फौजदार अनिल शिंदे, पोलीस शिपाई नितीन रावळ, कैलास साळुके यांच्या पथकाने केली आहे.