Home ताज्या बातम्या तपासणी करणारा डॉक्टर कोरोनाग्रस्त,पुण्यात शिक्रापूर परिसरामध्ये 144 गरोदर महिलांना क्वारंटाईन

तपासणी करणारा डॉक्टर कोरोनाग्रस्त,पुण्यात शिक्रापूर परिसरामध्ये 144 गरोदर महिलांना क्वारंटाईन

0

पुणे : पुण्यात शिक्रापूर परिसरामध्ये 144 गरोदर महिलांना क्वारंटाईन करण्यात आलंय. शिक्रापूरला सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजीस्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलाय. 69 गरोदर महिलांनी रेडिओलॉजिस्ट कडून तपासणी केली होती तर 75 महिलांचा रेडिओलॉजिस्ट सेंटरला भेट दिलेले आहे. या महिलांचा रेडिओलॉजिस्टशी थेट संपर्क आला नव्हता. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या सर्व महिलांना क्वारंटाईन करण्यात आलंय. सोनोग्राफी सेंटरमध्ये सहा, सात आणि आठ तारखेला डॉक्टरने या महिलांची तपासणी केली होती. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं डॉक्टरन 13 तारखेला स्वतःहून कोरोना टेस्ट केली होती. 14 तारखेला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला होता. शिक्रापूर परिसरातील 31 गावांमधील या महिला आहेत. मात्र शिक्रापूर मधील सर्वाधिक महिला असून या महिलांचे घरीच होम आयसोलेशन करण्यात आलंय. यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने परिसरातील गावांची आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण सुरू आहे. 31 गावामध्ये हे 60 वैद्यकीय पथक पाठवण्यात आलंय. एका गावात दोन पथक पाठविण्यात आलेत. त्याचबरोबर शेजारील दौंड, खेड,चाकण परिसरातील अशा वर्कर कडून देखील गावाचा सर्वे करण्यात आलाय. परीसरातील संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

जिल्हा रुग्णालयाची टीम ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्व महिलांचे तपासणी करणार आहे. या महिलांचे स्वॅब एनआयव्हीला पाठवणार आहे. सध्या या महिलांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसत नाही.

या गावातील आहेत महिला

शिक्रापूर -३५
तळेगाव ढमढेरे -२०
सणसवाडी -७
मुखई- ४
केंदूर3
धामारी2
करंजावणे2
कासारी2
कोंढापुरी 2
पाबळ2
विठ्ठल वाडी 2
भांबर्डे 1
गणेगाव वाघाळे1
जातेगाव बु 1
कोरेगाव 1
करंदी 1
मलठन 1
न्हावी सांगवी 1
पानवली 1
पिंपळे धुमाळ 1
जगताप 1
रांजणगाव गणपती 1
शेल पिंपळगाव 1
सोने सांगवी 1
टाकळी भीमा 2
वरुडे 1
रार गाव आंबेगाव 1
पत्ता नसलेले 43