तरुणांनो जलसंधारणात आता तुमची Turn

- Advertisement -


पाणी हा केवळ नैसर्गिक स्रोत नाहीतर आपल्या वर्तमानाचा आधार आणि भविष्यातील सुरक्षिततेची हमी आहे. आज आपण विकासाच्या वेगाने पुढे जात असताना पाण्याची उपलब्धताभूजल पातळी आणि बदलते हवामान ही आव्हाने अधिक तीव्र होत आहेत. पाऊस पडतोमात्र त्यातील प्रत्येक थेंब जमिनीत मुरतोच असे नाही. वाहून जाणारे पाणीकमी होत जाणारी जलसाठ्यांची क्षमता आणि वाढता पाण्याचा वापर यामुळे जलसंधारणाचा प्रश्न आता केवळ शेतीपुरता किंवा ग्रामीण भागापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी जोडलेला आहे. म्हणूनच आजच्या तरुण पिढीने जलसंधारणाकडे केवळ एक शासकीय उपक्रम म्हणून नव्हेतर आपल्या भविष्यासाठीची जबाबदारी म्हणून पाहण्याची गरज आहे.

पाणी अडवापाणी जिरवा हा विचार महाराष्ट्राच्या जलसंधारणाच्या वाटचालीतील महत्त्वाचा मूलमंत्र राहिला आहे. या विचाराला आजच्या काळातील आधुनिक तंत्रज्ञानलोकसहभाग आणि तरुणांची ऊर्जा यांची जोड मिळाली तर जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक होऊ शकते. नालेओढेविहिरीतलाव आणि जलस्रोतांची स्वच्छतापावसाचे पाणी साठविणेभूजल पुनर्भरणशेततळी आणि बंधाऱ्यांची निर्मितीवृक्षारोपण अशा उपक्रमांमध्ये तरुणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला तर त्याचा परिणाम केवळ एका गावापुरता मर्यादित राहणार नाही. एका तरुणाची कृती दुसऱ्याला प्रेरणा देईल आणि त्यातून गावागावांत जलसाक्षरतेची नवी चळवळ उभी राहू शकते.

आजची तरुणाई ही डिजिटल युगातील सर्वात प्रभावी शक्ती आहे. हातातील मोबाईल हा केवळ मनोरंजनाचे साधन न राहता जनजागृतीचे प्रभावी माध्यम बनू शकतो. एखाद्या जलसंधारणाच्या कामाचे छायाचित्रछोटा व्हिडिओ किंवा माहितीपूर्ण Reel हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकते. एक Reel मातीसाठीएक Reel पाण्यासाठी आणि एक Reel सुरक्षित भविष्यासाठी असा विचार घेऊन युवकांनी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केला तर जलसंधारणाला डिजिटल लोकचळवळीचे स्वरूप मिळू शकते. #SaveSoilSaveWater सारख्या संदेशातून पाण्याचे महत्त्वपाणी बचतीच्या सवयी आणि स्थानिक जलस्रोतांच्या संवर्धनाची गरज समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवता येईल.

जलसंधारणाची सुरुवात मोठ्या प्रकल्पांपासूनच झाली पाहिजे असे नाही. ती आपल्या घरापासूनमहाविद्यालयापासूनकार्यस्थळापासून आणि गावापासून होऊ शकते. पाण्याचा अपव्यय टाळणेगळणारे नळ दुरुस्त करणेपावसाचे पाणी साठविण्याच्या पद्धती स्वीकारणे आणि आपल्या परिसरातील जलस्रोतांची स्थिती समजून घेणे ही देखील तितकीच महत्त्वाची पावले आहेत. प्रत्येक तरुणाने आपल्या परिसराचा जलमित्र किंवा जलदूत म्हणून विचार केलातर पाण्याशी असलेले आपले नाते अधिक जबाबदार आणि संवेदनशील बनेल. कारण पाण्याची किंमत टंचाईच्या काळात समजण्यापेक्षा त्याची बचत समृद्धीच्या काळात करणे अधिक शहाणपणाचे आहे.

 भविष्यातील महाराष्ट्र कसा असेलयामध्ये आजच्या तरुणांचा वाटा निर्णायक असणार आहे. रोजगारशिक्षणतंत्रज्ञान आणि करिअर यांसोबतच पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणाची जाणीवही तरुणांच्या विचारविश्वाचा भाग झाली पाहिजे. जलसंधारण ही कोणत्याही एका विभागाची किंवा सरकारची जबाबदारी नाहीती समाजाच्या सामूहिक सहभागातून यशस्वी होणारी प्रक्रिया आहे. शासनाच्या प्रयत्नांना नागरिकांचा सहभाग आणि तरुणांची कल्पकता यांची साथ मिळाली तर पाण्याच्या प्रश्नावर दीर्घकालीन आणि शाश्वत उपाय उभे राहू शकतात. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्टपासून जलसंधारण सप्ताह तसेच अभियानास प्रारंभ करूनजलसंधारणाच्या विविध उपाययोजनांबाबत जनजागृतीलोकसहभाग आणि प्रत्यक्ष जलसंधारणाच्या कामांना शासन आणि लोकसहभागातून प्रोत्साहन देण्यात येत आहे.

म्हणूनच तरुणांनोआता तुमची Turn आहे! फक्त पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्याची नाहीतर कृती करण्याची. एखादा जलस्रोत स्वच्छ करण्यापासून सुरुवात कराएखादे झाड लावापाण्याचा एक थेंब वाचवाएखाद्याला पाणी बचतीचा संदेश द्या किंवा आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जलसंधारणाची सकारात्मक गोष्ट शेअर करा. तुमची एक छोटी कृती अनेकांना प्रेरणा देऊ शकते. Save Soil, Save Water, Secure Tomorrow हा केवळ Hashtag न राहता आपल्या कृतीचा मंत्र बनला पाहिजे. कारण माती वाचली तर पाणी टिकेलपाणी टिकले तर शेती टिकेल आणि शेती टिकली तर आपले भविष्य सुरक्षित राहील. चलामाती वाचवूयापाणी जपूया आणि आपल्या हातांनी जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया!

सचिन अडसूळ, 

जिल्हा माहिती अधिकारीसिंधुदुर्ग
0000




Source link

- Advertisement -