Home ताज्या बातम्या ‘…तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वत:च नरेंद्र मोदींना दूर सारेल’

‘…तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वत:च नरेंद्र मोदींना दूर सारेल’

0
‘…तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वत:च नरेंद्र मोदींना दूर सारेल’

म. टा. प्रतिनिधी । मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ओसरल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना अडवाणींप्रमाणे दूर सारेल, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ता, माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी रविवारी केला. संघाचे मोतीबाग हे पुण्यातील कार्यालय माझ्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे संघाच्या कार्यपद्धतीचा जवळून अभ्यास करायला मिळतो. संघटनेपेक्षा कुठल्याही व्यक्तीस ते एका मर्यादित लोकप्रियतेपेक्षा मोठे होऊ देत नाहीत. तसेच ‘गरज सरो वैद्य मरो’ या तत्त्वानुसार प्रभुत्व गमावणाऱ्या व्यक्तीला संघ अलगद बाजूला सारतो असे गाडगीळ म्हणाले.

वाचा: ‘ट्विटरचे राजकीय महत्त्व भाजपसाठी संपले, कारण…’

करोनाची पहिली लाट थोपवून धरल्याची केंद्रीय नेतृत्वाने केलेली भ्रामक कल्पना, स्तुतिसुमनांच्या घंटानादामुळे तज्ज्ञांच्या इशाऱ्यांकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष, कुंभमेळा व पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात दाखविलेली अपरिपक्वता, त्यानंतर कृतीतील बेसावधपणा यामुळे करोनाची दुसरी लाट हाताबाहेर गेली असा आरोप गाडगीळ यांनी केला.

वाचा: मुंबईतील वांद्रे परिसरात इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू

Source link