Home बातम्या राष्ट्रीय …तर लसीकरण केंद्रच बंद करणार, नागरिकांच्या तोबा गर्दीमुळे मोठा गोंधळ

…तर लसीकरण केंद्रच बंद करणार, नागरिकांच्या तोबा गर्दीमुळे मोठा गोंधळ

0
…तर लसीकरण केंद्रच बंद करणार, नागरिकांच्या तोबा गर्दीमुळे मोठा गोंधळ

हायलाइट्स:

  • लसीकरणाच्या तुटवड्यामुळे राज्याभर केंद्रांवर गोंधळ
  • नागरिकांच्या भल्या मोठ्या रांगा पण लस संपली
  • अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ

औरंगाबाद : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेन राज्यभर हाहाकार माजलेला पाहायला मिळतो. अशात एकीकडे वाढती रुग्णसंख्या तर दुसरीकडे लसीकरणासाठी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत नागरिकांची तोबा गर्दी असं काहीसं चित्र आज राज्यात पाहायला मिळत आहे. यामध्ये औरंगाबादेत तर लसीकरण केंद्रावर मोठा गोंधळ उडाला. औरंगाबादच्या सावरकर रुग्णालयात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पण लसी संपल्यामुळे मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात आधीच लसीकरणाचा तुटवडा आहे. अशात आज लसींचा साठा उपलब्ध असल्याची माहिती मिळताच नागिकांनी केंद्रांवर गर्दी करण्यास सुरुवात केली. या गर्दीत ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत असल्याचंही समोर आलं आहे. औरंगाबादमध्ये अनेक केंद्रावर अगदी १५० लसी उपलब्ध आहेत. पण नागरिकांच्या तोबा गर्दीमुळे लसीकरण बंद करू अशीच धमकीच अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

टोकन वाटून लस देण्याचं काम प्रत्येक केंद्रावर सुरू आहे. पण लस संपल्यामुळे नागरिकांनी परत घरी जाण्याची वेळ आली आहे. भर उन्हात प्रवास करून लसीसाठी यायचं पण लस मिळत नसल्यामुळे नागरिक संतापले आहेत. अनेक केंद्रावरती भांडणं सुरू आहेत. यामुळे पोलिसांनी केंद्रावर धाव घेत नागरिकांनाही समजवण्याचा प्रयत्न केला.
लसीकरणासाठी केंद्रावर एकच झुंबड; बीकेसीत चेंगराचेंगरी

लसीकरणाचा तुटवडा झाल्यामुळे राज्यभर लसीकरण केंद्रावर हीच अवस्था आहे. लसीकरणासाठी 100 टोकन दिले आहेत. यानंतर परत लस आली तर लसीकरणाला सुरूवात होईल अन्यथा लोकांना घरी जावं लागेल असं केंद्रावरील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एकीकडे रुग्णसंख्येचा स्फोट घडत आहे; तर दुसरीकडे खाटा मिळत नाहीत, ऑक्सिजन, औषधे आणि लशींचा तुटवडा यामुळे लोकांमध्ये सध्या भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी लशींचा मुबलक साठा आल्याचे समजताच शहरातील सर्वच केंद्रांवर प्रचंड गर्दी झाली. या गर्दीमुळे आपल्याला लस मिळणार नाही या भीतीने महापालिकेच्या बीकेसी लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही.

Source link