Home गुन्हा तलावात बुडालेल्या दाेघा भावांना बाहेर काढून जिवंत करण्यासाठी ठेवले मिठात

तलावात बुडालेल्या दाेघा भावांना बाहेर काढून जिवंत करण्यासाठी ठेवले मिठात

0
तलावात बुडालेल्या दाेघा भावांना बाहेर काढून जिवंत करण्यासाठी ठेवले मिठात 
जळगावातील खळबळजनक घटना; व्हाॅट‌्सअॅपच्या संदेशानुसार केला प्रयत्न

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील मेहरूण तलावात अक्सानगरातील दाेन बालके सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बुडाली. व्हाॅट‌्सअॅपवर अालेल्या संदेशानुसार ती जिवंत हाेतील या अाशेने त्यांना पाण्यातून बाहेर काढून शासकीय रुग्णालय व महाविद्यालयातील शवविच्छेदनगृहात चार तास दीड क्विंटल मिठात ठेवले. मात्र, हा प्रयाेग यशस्वी ठरू शकला नाही. 
साेशल मीडियाने नागरिकांचे जीवन ढवळून टाकले अाहे. दरराेज वेगवेगळी माहिती असलेले हजाराे संदेश व्हाॅट्सअॅपवर येतात. परंतु, सर्वच मॅसेज खरे असतात, असे नाही. त्याची परिचिती शुक्रवारी जळगावकरांना अाली. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता शहरातील मेहरूण तलावात उमेर जकी अहमद (वय १२) व अबुलैस जकी अहमद (वय १६, रा. अलअजिज अपार्टमेंट, अक्सानगर) ही दाेन बालके बुडाली. त्यांना पाण्यातून बाहेर काढून शासकीय उर्वरित. पान १० 
सविस्तर. दिव्य सिटी 
जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात मिठात ठेवलेली दाेघी बालके. 
असा हाेता माेबाइलवर अालेल्या संदेशातील दावा 
जर कधी कुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला अाणि त्याचे शरीर ३ ते ४ तासांत मिळाले तर त्याचे प्राण परत मिळवता येऊ शकतात. जर कधी कुणाला अशी दुर्घटना दिसली किंवा एेकू येईल तर त्वरित अाम्हाला सांगा. कुणाचा जीव वाचू शकताे. अामचा माेबाइल क्रमांक ९४५४३१११११ व ९३३५६७३००१ अाहे. तुम्हाला नम्र विनंती अाहे की, या माहितीला जास्तीत जास्त लाेकांपर्यंत पाेहाेचवा. कुणा एकाचा जीव वाचवू शकलाे तर जीवन धन्य झाले, असे समजेल. दीड क्विंटल मीठ बेडसारखे पसरवून त्यावर कपडे काढून झाेपवा. मीठ हळूहळू पाणी खेचून घेईल. रुग्ण शुद्धीवर अाल्यानंतर रुग्णालयात घेऊन जावे. यापूर्वी रुग्णालयात घेऊन गेले अाहात. डाॅक्टरांनी मृत घाेषित केल्यास तुम्ही मिठाचा उपचार करावा. ईश्वराच्या कृपेने अानंदाची लहर पसरेल. डाॅक्टरांनी मृत घाेषित केल्यावर अंत्यसंस्कार करण्याची घाई करू नये. लवकरात लवकर मिठाचा प्रयाेग करावा. बुडालेल्या व्यक्तीला जेवढा कमी वेळ झाला असेल तेवढा त्वरित शुध्दीवर येण्याची शक्यता असते. काही लाेक मीठ घेण्यापूर्वीच गेल्यास परिणाम त्वरित हाेईल. के. सी. रुपरा नारायणगढ, मंदसाैर, (मध्य प्रदेश) ९३०३२३७५४८ असा माेबाइल क्रमांक देण्यात अालेला अाहे.