‘तारक मेहता…’चं नव्हे तर बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटात दिसली होती दिशा वकानी

‘तारक मेहता…’चं नव्हे तर बॉलिवूडच्या  बिग बजेट चित्रपटात दिसली होती दिशा वकानी
- Advertisement -


मुंबई: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरली. त्यात दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीनं प्रसूती रजेनंतर या मालिकेचा निरोप घेतला होता. गेल्या अनेक वर्षांपासून मालिकेपासून दूर असलेली दयाबेन अर्थात दिशा वकानी पुन्हा एकदा मालिकेत झळकणार की नाही हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

दिशा आज घराघरांत पोहोचली ती दयाबेन अर्थात दयाभाभी या भूमिकेमुळे. पण तिने यापूर्वी अनेक गाजलेल्या चित्रपटातही काम केलं आहे. दिशा वकानीनं ऐश्वर्या राय बच्चन आणि ऋतीक रोशन स्टारर ‘जोधा अकबर’ सिनेमात माधवीची भूमिका साकारली होती.तसंच शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित स्टारर ‘देवदास’ चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

२००८मध्ये आलेला प्रियांका चोप्रा आणि हरमन बवेजा यांचा ‘लव स्टोरी 2050’सिनेमात दिशा एका भूमिकेत दिसली होती. तर सी कंपनी’मध्येही तिनं छोटं पात्र साकरलं होतं. या सिनेमात अनुपम खेर , मिथुन चक्रवर्ती आणि राजपाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. इतकंच नाही तर २००५मध्ये आलेल्या ‘मंगल पांडेः द राइजींग’ या सिनेमात दिशानं यासमीन हे पात्र साकरालं होतं.

वाद संपेना
प्रसूती रजेनंतर दिशाने काही अटी निर्मितीसंस्थेसमोर ठेवल्या होत्या, पण त्यावर काही तोडगा निघाला नव्हता, त्यामुळे दयाबेन हे पात्र सध्या मालिकेत दिसत नाहीय. पण दिशानं नुकतंच याच मालिकेच्या निर्मात्यांशी संपर्क साधल्याचं कळतंय. दिशा वकानी सप्टेंबर २०१७पासून ‘तारक मेहता…’ मालिकेपासून लांब होती. मधल्या काळात दिशा वकानीचे पती आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये दिशाच्या चित्रीकरणाच्या वेळा आणि मानधनावरून वाद झाल्याची माहिती समोर आली होती.



Source link

- Advertisement -