Home मनोरंजन ‘तारक मेहता..’ फेम ‘बबीता’ला सुप्रीम कोर्टाकडून मोठा मिळाला दिलासा

‘तारक मेहता..’ फेम ‘बबीता’ला सुप्रीम कोर्टाकडून मोठा मिळाला दिलासा

0
‘तारक मेहता..’ फेम ‘बबीता’ला सुप्रीम कोर्टाकडून मोठा मिळाला दिलासा

[ad_1]

हायलाइट्स:

  • मुनमुन दत्ताला सुप्रीम कोर्टाकडून मिळाला दिलासा
  • व्हिडीओमध्ये जातीवाचक शब्दाचा प्रयोग केल्याप्रकरणी मुनमुनविरोधात गुन्हे दाखल
  • मुनमुनविरोधातील सर्व कारवाईंना दिली स्थगिती

मुंबई : टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ मालिकेतील बबीताजी म्हणजे मुनमुन दत्ताला सु्प्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मुनमुनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये जातिवाचक टिप्पणी केली होती. याप्रकरणी तिच्याविरोधात महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात या चार राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले होते. सु्प्रीम कोर्टाने या चारी प्रकरणांची सुनावणी केली असता तिच्यावरील फौजदारी कारवाईला स्थगिती दिली आहे.

सु्प्रीम कोर्टाने याप्रकरणाची शुक्रवारी सुनावणी केली. त्यावेळी मुनमुनच्या विरोधात चार राज्यांत सुरू असलेल्या कारवाई करण्यावर स्थगिती दिली आहे. त्याचसोबत या चारही राज्यांत सुरू असलेले खटले एकाच ठिकाणी वर्ग करण्यात यावे, अशा आशयाची नोटीसही जारी केली आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीवेळी मुनमुनच्या वकीलांनी तिची बाजू मांडताना सांगितले की, ‘मुनमुन ही पश्चिम बंगालची आहे. त्यामुळे तिने जो जातिवाचक शब्द त्या व्हिडीओमध्ये वापरला होता, तो बंगालमध्ये सर्वसामान्यपणे वापरला जातो. परंतु तो शब्द जातिवाचक आहे, याची तिला अजिबात माहिती नव्हती.’ मुनमुनने जो शब्द तिच्या व्हिडीओमध्ये वापरला होता, त्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या त्या समाजातील लोकांनी मुनमनुच्या विरोधात गुन्हा नोंदवला.

मुनमुनने मागितली होती माफी
या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर मुनमुनला खूपच ट्रोल करण्यात आले. त्यानंतर तिची चूक लक्षात आल्यानंतर तिने सोशल मीडियावर सर्वांची माफी मागत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मुनमुनने आपल्या निवेदनात लिहिले होते की, ‘सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये जे शब्द वापरले त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. भाषिक अज्ञानामुळे मी तो शब्द त्याचा अर्थ माहित नसताना वापरला.’

मुनमुनने पुढे लिहिले की,‘नंतर त्या शब्दाचा अर्थ मला कळला. त्यानंतर मी लगेच त्या व्हिडीओमधून तो भाग काढून टाकला. मला प्रत्येक जाती, वंशाच्या किंवा लिंगातील प्रत्येक व्यक्तीबद्दल अत्यंत आदर आहे आणि मी आपल्या समाजात किंवा राष्ट्रासाठी त्यांच्या अपार योगदानाची कबुली देतो. या शब्दाच्या वापरामुळे अनवधानाने दुखावले गेलेल्या प्रत्येक व्यक्तीची मला मनापासून मागायची आहे आणि त्याबद्दल मला खूप वाईट वाटते आहे.’

[ad_2]

Source link