तारापूर : तारापूर एमआयडीसी स्फोटप्रकरणी आज विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर यांनी पाहणी केली. त्यावेळेस त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच ऐवजी दहा लाखांची मदत मिळावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. शिवाय या घटनेस जबाबदार असलेले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक सुरक्षेचे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. याशिवाय त्यांनी मागील सरकारमधील शिवसेनेचे उद्योगमंत्री आणि पर्यावरणमंत्री यांच्यावरही निशाणा साधला. दरेकर यांनी एएनके फार्मा या कंपनीत जाऊन पाहणी केली. शिवाय हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली.
- Advertisement -