हायलाइट्स:
- अभिनेता बोमन ईराणी यांच्या आईचे निधन
- आईच्या निधनाची बातमी बोमन यांनीच केली शेअर
- आईच्या स्मरणार्थ बोमनने शेअर केली भावूक पोस्ट
बोमन यांनी आईच्या निधनाची बातमी देताना एक भावुक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली. बोमन यांनी लिहिले की, ‘ आई ईराणीने झोपेत असतानाच शांतपणे या जगाचा निरोप घेतला. ती ९४ वर्षांची होती. आईने ३२ वर्षांमध्ये माझ्यासाठी आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका केल्या. माझ्या आईचे व्यक्तिमत्व अतिशय खेळकर असे होते. अतिशय मजेशीर गोष्टी ती आम्हाला सांगायची. जेव्हा मी सिनेमा बघायला जायचो तेव्हा माझे मित्र सोबत असतील याची ती काळजी घ्यायची. इतकेच नाही तर सिनेमा बघताना पॉपकॉर्न नक्की खा असेही आवर्जून सांगायची. आईला गाणे ऐकण्याची आणि खाण्याची खूप आवड होती. त्याचप्रमाणे ती विकिपीडियावर घडणा-या घटना ती चेक करायची.’
बोमन यांनी पुढे लिहिले की, ‘आई नेहमी सांगायची लोक तुझे कौतुक करतात म्हणून तू अभिनेता नाहीस. तुझ्यामुळे लोकांच्या चेह-यावर हसू येईल, असा अभिनय तू कर. जायच्या आदल्या दिवशी तिने माझ्याकडे मलाई कुल्फी आणि आंबे खाण्यासाठी मागितले होते. तिला वाटले असते तर तिने माझ्याकडे चंद्र आणि तारे देखील मागितले असते. ती माझ्यासाठी नेहमीच स्टार होती आणि कायम राहील… ‘