तिलारी घाटात बस अपघात, पाच जण जखमी

- Advertisement -

कोल्हापूर : कोल्हापूरहून पणजीकडे जात असलेल्या एसटी बसचा तिलारी घाटात अवघड वळणावर अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नसुन 5 जण किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कागल आगाराची बस एम.एच. 14 बी.टी 3572 सकाळी कोल्हापूरहून पणजीकडे जाण्यासाठी निघाली होती. तिलारी घाटात बस आली असता घाट सुरू झाल्यानंतरच्या दुसऱयाच वळणावर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यालगतच्या संरक्षण भिंतीला धडकली. या अपघातात बसमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. बसमध्ये एकूण चाळीस प्रवाशी होते. घटनेची माहिती मिळताच चंदगड आगाराचे आगारप्रमुख विजय हवालदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.

- Advertisement -