Home मनोरंजन ‘तिला माझी गर्लफ्रेण्ड म्हणणं बंद करा…’ २२ वर्ष लहान जॉर्जियासोबतच्या नात्याला अरबाज खानचा नकार?

‘तिला माझी गर्लफ्रेण्ड म्हणणं बंद करा…’ २२ वर्ष लहान जॉर्जियासोबतच्या नात्याला अरबाज खानचा नकार?

0
‘तिला माझी गर्लफ्रेण्ड म्हणणं बंद करा…’ २२ वर्ष लहान जॉर्जियासोबतच्या नात्याला अरबाज खानचा नकार?

[ad_1]

हायलाइट्स:

  • १९ वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे झाले होते अरबाज आणि मलायका
  • आपल्यापेक्षा २२ वर्ष लहान जॉर्जियाला डेट करतोय अरबाज
  • जॉर्जियाला फक्त अरबाजची गर्लफ्रेण्ड म्हणून संबोधण्यावर अरबाजचा आक्षेप

मुंबई– बॉलिवूड अभिनेता अरबाज खान चित्रपटांमध्ये खास कमाल दाखवू शकला नसला तरीही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो बऱ्याचदा सोशल मीडियावर चर्चेत असतो. अरबाज आणि मलायका अरोरा यांनी २०१७ साली वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला होता. त्यानंतर मात्र मलायका आणि अरबाज यांनी आपापली वाट निवडली. मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे तर अरबाज त्याच्यापेक्षा २२ वर्ष लहान असणाऱ्या जॉर्जिया एंड्रियानी सोबत रिलेशनमध्ये आहे. परंतु, अरबाजने मात्र तिला फक्त आपली गर्लफ्रेण्ड म्हणवून घेण्यास नकार दिला आहे.

राज कुंद्रा प्रकरणात भडकला उमेश कामत, दिला कारवाईचा इशारा

पत्रकारांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाज म्हणाला, ‘काही व्यक्तींनी जॉर्जियाला फक्त माझी गर्लफ्रेण्ड म्हणणं बंद केलं पाहिजे. तिची एक वेगळी ओळख आहे. ती एक उत्कृष्ट इटालियन मॉडेल आहे आणि एक सुंदर डान्सरदेखील आहे. पण तिला फक्त माझ्या गर्लफ्रेण्डच्या नावाने ओळखणं खूप चुकीचं आहे. सगळ्यात आधी तर जॉर्जियाला एक व्यक्ती म्हणून ओळख मिळाली पाहिजे. मी त्या लोकांचं नाव घेत नाहीए जे तिला वारंवार अरबाजची गर्लफ्रेण्ड म्हणत असतात. तिची स्वतःची एक ओळख आहे. तुम्ही तिला अरबाजची गर्लफ्रेण्ड नाही म्हणू शकता.’


जॉर्जिया सोबतच्या नात्यावर बोलताना अरबाज म्हणाला, ‘जॉर्जिया आता माझ्या आयुष्यात आहे. आम्ही एकत्र आहोत पण फक्त हीच तिची ओळख नाहीये. तुम्ही सहज माझ्याबद्दल लिहिताना सलीम खान यांचा मुलगा किंवा सलमान खानचा भाऊ असं लिहिता. पण ते किती चुकीचं आहे. प्रत्येकाला आपापली स्पेस दिली पाहिजे अगदी जॉर्जियाला देखील.’ अरबाज ५२ वर्षाचा आहे तर जॉर्जिया ३० वर्षांची आहे. अनेक ठिकाणी अरबाज आणि जॉर्जियाला एकत्र पाहिलं जातं. ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.

…आणि तो टर्निंग पॉइंट ठरला; अभिजीत गुरू सांगतोय त्याच्या लेखन प्रवासाबद्दल



[ad_2]

Source link