Home शहरे मुंबई तीन केंद्रांवरच लसीकरण

तीन केंद्रांवरच लसीकरण

0
तीन केंद्रांवरच लसीकरण

[ad_1]

म. टा. वृत्तसेवा, पनवेल

१ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू होईल, असे जाहीर करणाऱ्या करणाऱ्या पनवेल महापालिकेला शनिवारी आपल्या क्षेत्रातील १९पैकी केवळ तीन लसीकरण केंद्रांवरच लसीकरण सुरू ठेवता आले. यामुळे लसीकरणातील गोंधळ कायम असल्याचे दिसले.

लशींचा साठा उपलब्ध नसल्यामुळे सध्या महापालिका क्षेत्रात लसीकरणाचा गोंधळ सुरू आहे. दोन दिवसांपासून लशी संपल्यामुळे पनवेलमध्ये लसीकरण बंद होते. १ मेपासून केंद्र आणि राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे लसीकरण सुरू होईल की नाही, याबाबत साशंकता होती. शुक्रवारी रात्रीपर्यंत साठा उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण सकाळी सुरू झाले नव्हते. अखेर शनिवारी दुपारी १ वाजता सहा हजार लशींचा साठा महापालिकेच्या आरोग्य विभागाला उपलब्ध झाला. नागरी आरोग्य केंद्र १, ३ आणि ५ या ठिकाणी दुपारनंतर लसीकरण सुरू करण्यात आले. १८ ते ४४ वयोगटातील नोंदणीकृत नागरिकांना लस देण्यात आली. परंतु केवळ तीनच केंद्रे सुरू असल्याने पहिल्याच दिवशी या वयोगटातील लस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण खूपच कमी होते.

लशी उपलब्ध नसल्याने सकाळी लसीकरण बंदच होते. ते अचानक तीन केंद्रांवर सुरू केल्याने या केंद्रांवर बराच काळ नागरिक उपलब्ध नव्हते. अखेर अॅपद्वारे नोंदणी केलेल्या नागरिकांशी संपर्क साधून त्यांना लसीकरणासाठी बोलावण्यात आले. सध्या तरी लशीची केवळ पहिली मात्रा घेणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ दिला जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करून लसीकरणाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विनाकारण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले. भविष्यात लशींचा साठा ज्या प्रमाणात उपलब्ध होईल, त्यानुसार वेळोवेळी योग्य निर्णय घेतला जाईल. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच पात्र नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी महापालिका आवश्यक ते सर्व नियोजन करीत असून नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी गर्दी करू नये व करोना प्रतिबंधात्मक नियमांचे परिपूर्ण पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने या निमित्ताने पुन्हा एकदा करण्यात येत आहे, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा चांडक यांनी सांगितले.

[ad_2]

Source link