Home गुन्हा तीन मुलांना विष पाजून पित्याची आत्महत्या

तीन मुलांना विष पाजून पित्याची आत्महत्या

0


बेंबळे तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील घटना .
इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील एका पित्याने माढा तालुक्यातील बेंबळे येथे स्वतःची दोन मुले आणि एका मुलीला शीत पेयातून विषारी द्रव्य पाजून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या मुलांपैकी दोन मुलांचा इंदापूर सरकारी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला, तर मुलगी मृत्यूशी झुंज देत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले .या कृत्या मागचे कारण टेंभुर्णी पोलिसांना अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रवींद्र प्रभाकर लोखंडे वय वर्ष 35 राहणार वडापुरी तालुका इंदापूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान हा प्रकार निदर्शनास आला. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र हे 31 ऑक्टोबर रोजी मुलगा आशिष वय 6 अजिंक्य वय 9 मुलगी अनुष्का वय 11 या तिघांना घेऊन घराबाहेर पडले. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना बेंबळे तालुका माढा येथील साडू हरिदास नारायण कांबळे यांचेकडे जात असल्याचे सांगितले .दरम्यान गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान ते मुलांना घेऊन मोटारसायकलवरून बेंबळे येथे दाखल झाले. मात्र नातेवाईक कांबळे हे घरी नव्हते, ते मजुरीसाठी कामाला बाहेर गेल्याचे त्यांच्या शेजाऱ्याकडून त्यांना समजले. त्यानंतर ते तीनही मुलांना घेऊन बेंबळे येथील उजनी डावा कालवा किलोमीटर 51 याठिकाणी एका झाडाखाली थांबून मुलांना खायला दिले. त्याच बरोबर थंडपेय ही मुलांना दिले .आणि त्यातूनच त्यांनी विषारी द्रव्य मुलांना खाऊ घातले. ही मुले वस्तीवर पाणी पिण्यासाठी गेल्याचे लक्षात येताच रवींद्र लोखंडे यांनी बाजूच्या झाडास गळफास घेतला. या घटनेबाबत टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मगदूम साहेब आपला फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पाटील किर्ते यांच्या उपस्थितीत लोखंडे यांचा मृतदेह खाली घेतला आणि शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केला .बीट अंमलदार लोंढे ,पोलीस नाईक झोळ ,बनसोडे यांचे पथक तपास कामाला लागले आहे.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी