पुणे : परवेज शेख मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पुणे स्टेशन ते सॅलसबरी पार्क, मार्केटयार्ड सोसायटी प्रवास करत असताना येलंदी आपली लाख रूपयाचे दागिने, महत्वाची कागदपत्रे व इतर साहित्य असलेली बॅग रिक्षात विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. रिक्षा गेल्यावर त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी बंडगार्डन पोलिस स्टेशनात सहायक पोलिस निरीक्षक संदिप जमदाडे याना सांगितले. सदर कामगिरीत पोलिस निरीक्षक दिगंबर शिंदे यांनी पथकाला सुचना दिल्या. त्यानुसार सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहून रिक्षा मालकाची माहिती व मोबाईल काढून त्याच्याशी संपर्क साधून सदर बॅग पथकाने पोलिस ठाण्यात जमा करायला सांगितल्याने त्यांनी ती जमा केली. सदर बॅग येलंदी यांच्या ताब्यात दिली व ऐन दिवाळीत विसरलेली बॅग मिळाल्याने त्या आनंदी होऊन पोलिसांचे आभार मानले.
सदर कामगिरी पोलिस निरीक्षक दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जमदाडे, हवालदार हरिष मोरे, पोलिस नाईक अय्याज दड्डिकर, पोलिस शिपाई किरण तळेकर यांनी केली.