ती असं काही करुच शकत नाही,आमचा पोलिसांवरही विश्वास नाहीए; बहिणीकडून हिनाची पाठराखण

ती असं काही करुच शकत नाही,आमचा पोलिसांवरही विश्वास नाहीए; बहिणीकडून हिनाची पाठराखण
- Advertisement -


हायलाइट्स:

  • इगतपुरीमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीमध्ये मराठी अभिनेत्री हिना पांचाळचं नाव आलं होतं समोर
  • हिना पांचाळला या रेव्ह पार्टीमधून करण्यात आली होती अटक
  • हिना पांचाळच्या अटकेनंतर तिच्या बहिणीनं दिली प्रतिक्रिया

मुंबई: काही दिवसांपूर्वीच इगतपुरी येथे दोन खासगी बंगल्यांमध्ये सुरू असलेल्या एका पार्टीवर छापा टाकत पोलिसांनी ड्रग्स जप्त केले होते. तसेच पार्टी करत असलेल्या सर्वांनाच पोलिसांनी अटक केली होती. ज्यात मराठी अभिनेत्री हिना पांचाळचं नाव समोर आलं होत. या पार्टीमधून पोलिसांनी कोकेन, हुक्का आणि इतर ड्रग्ज हस्तगत केले होते. पण हिनाला अटक झाल्यानंतर तिचे चाहतेही हैराण झाले होते. आता या संपूर्ण प्रकरणावर हिनाच्या बहिणीनं आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हिना पांचाळची आई आणि बहीण यांनी हिनाच्या अटकेनंतर याप्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. हिनाची बहीण म्हणाली, ‘हिना सांगून गेली होती की, ती मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी जात आहे. तिनं आईला विचारलं तेव्हा आम्हाला सर्व सामान्य वाटलं आणि तिला आईनं जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर आम्ही या पार्टीसंबंधीत बातम्या पाहिल्या ज्यामुळे आम्हालाही धक्का बसला होता. पण सर्वात त्रासदायक गोष्ट ही होती की, या सर्व बातम्यांमध्ये हिनाचं नाव हायलाइट करण्यात आलं होतं.’

हिनाची बहीण पुढे म्हणाली, ‘बातम्यांमध्ये सातत्यानं हिनाकडे हे सापडलं, ते सापडलं असं बोललं जात होतं, पण त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. ते माझ्या बहिणीला ओळखत नाही. माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. तेव्हा तिनं सांगितलं की, पार्टीमध्ये काही पोलिस आले होते. पण हे एवढं मोठं प्रकरण असेल याची कल्पना नव्हती. आम्ही मीडियावर किंवा पोलिसांवरही विश्वास विश्वास ठेवला नाही. मला माझ्या बहिणीवर विश्वास आहे. ती असं काहीच करणार नाही.’

हीना पांचाळ ही मराठी बिग बॉस दुसऱ्या पर्वातील पहिली वाइल्ड कार्ड एंट्री घेतलेली स्पर्धक होती. हिना अभिनेत्री नृत्यांगणा असून ती आयटम साँग साठी प्रसिद्ध आहे. दरम्यान पोलिसांनी संशयितांकडून कोकेन, हुक्का, इतर ड्रग्ज हस्तगत केले होते. स्काय ताज व्हिला आणि स्काय लगून व्हिला या खासगी बंगल्यांमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पाटील यांच्यासह पथकाने बंगल्यावर छापा मारला होता. ज्यात सर्व संशयित ड्रग्ज घेत असल्याचे समोर आले होते. त्यांच्याकडून कोकेन, हुक्का व इतर ड्रग्जसह त्यांची वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.



Source link

- Advertisement -