हायलाइट्स:
- दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान सोशल मीडियावर असतो चर्चेत
- एका युझरनं बाबिलला विचारल्या त्याच्या धर्मासंबंधी प्रश्न
- युझरच्या प्रश्नाला बाबिल खाननं दिलं सडेतोड उत्तर
सोशल मीडियावर एका पोस्टवर कमेंट करताना एका युझरनं बाबिलला, ‘तू मुस्लीम आहेस का?’ असा प्रश्न विचारला. ज्यात उत्तर देताना आपण कोणत्याही धर्माचे नसल्याचं बाबिलनं सांगितलं. या युझरला उत्तर देताना बाबिल म्हणाला, ‘मी बाबिल आहे.’ याशिवाय या कमेंटचा स्क्रिनशॉट शेअर करताना त्यानं लिहिलं, ‘मी बायबल, भगवत गीता आणि कुराण वाचलं आहे. सध्या गुरू ग्रंथ साहिब वाचत आहे. मी सर्व धर्मांचा आदर करतो.’ बाबिलच्या उत्तराचं सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत.
इरफान खान यांच्या निधनानंतर बाबिल नेहमीच त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करताना दिसत होता. मात्र मध्यंतरीच्या काळात त्यानं पोस्ट शेअर करणं बंद केलं होतं. जेव्हा एका चाहत्यानं याचं कारण विचारलं तेव्हा त्याला उत्तर देताना बाबिल म्हणाला, ‘काही लोकांना वाटतं की, मी अशाप्रकारे पोस्ट शेअर करून स्वतःचं प्रमोशन करत आहे. या गोष्टीचं मला दुःख झालं. ज्यामुळे मी अशा प्रकारे पोस्ट करण बंद केलं. पण योग्य वेळी आणि तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव मी त्यांच्याबद्दल नक्की पोस्ट करेन.’
बाबिलच्या कामाबद्दल बोलायचं तर तर तो लवकरच ‘काला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या चित्रपटाची निर्मिती अनुष्का शर्माचं प्रोडक्शन हाऊस करत आहे. या चित्रपटात बाबिल खानसोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.