हायलाइट्स:
- दिग्दर्शक कबीर खान यांची पत्नी आहे मिनी माथूर
- कबीर यांनी लावले आहेत चित्रपटावर पैसे
- चित्रपटावर पैसे लावण्यावरून मिनीला ट्रोल करण्याचा युझरचा प्रयत्न
मिनी माथुरला आवडली नाही कमेन्ट
मिनीचे पती कबीर खान बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी सलमान खानसोबत ‘एक था टायगर’, ‘बजरंगी भाईजान’, ‘ट्यूबलाइट’ सारखे चित्रपट बनवले आहेत. सध्या ते आपला आगामी चित्रपट ‘८३’ च्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट ४ जून २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. याच गोष्टीवरून युझरने मिनीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. युझरने लिहिलं, ‘मी ऐकलंय की, ‘८३’ चित्रपटावर पैसे लावल्यामुळे तुमचे पती दिवाळखोर झालेत. त्यांच्याकडे आता काहीच पैसे नाहीयेत. हे खरं आहे का.’ युझरच्या प्रश्नावर सणसणीत उत्तर देत मिनीने त्याचं तोंड बंद केलं.
मदतीच्या आशेने लोकांनी केली सोनू सूदच्या घराबाहेर गर्दी
‘हा फावला वेळ मदत करण्यात घालवा’
मिनीने लिहिलं, ‘तुमचा वेळ अशा गोष्टींमध्ये लावा ज्यामुळे कुणाचीतरी मदत होईल. असे प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालवू नका.’ मिनीच्या या उत्तरानंतर त्या युझरने त्याचं ट्वीट डिलीट केलं. तर दुसरीकडे मिनीच्या चाहत्यांनीही त्या युझरला चांगलंच सुनावलं आणि मिनीला अशा लोकांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला.
चित्रपटात कपिल देवची भूमिका साकारणार रणवीर सिंग
‘८३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन मागच्या वर्षभरापासून रखडलं आहे. दरम्यान आता हळूहळू सर्व ठिक होत असतानाच काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. हा चित्रपट येत्या ४ जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
कंगनाची फिरकी घेण्याच्या नादात स्वतःच ट्रोल झाली कविता कौशिक
‘८३’ हा चित्रट माजी क्रिकेट कर्णधार कपिल देव यांच्या बायोपिक आहे. हा चित्रपट १९८३ मधील भारताच्या विश्वचषक विजयावर आधारित आहे. रणवीर सिंग या चित्रपटात कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार असून रणवीरनं या भूमिकेसाठी बरीच मेहनत केली आहे. या चित्रपटात रणवीरसोबत दीपिका पदुकोण सुद्धा कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे.