Home शहरे तुमच्याकडे बघताना मादी वाटयला नको, तर माय आठवली पाहिजे – सिंधूताई सपकाळ

तुमच्याकडे बघताना मादी वाटयला नको, तर माय आठवली पाहिजे – सिंधूताई सपकाळ

0

हिंगोली : मुलींनी आता सबळ व्हायला हवे, स्वत मध्ये कुवत निर्माण केली पाहिजे. मुलींनी दुर्बळ राहून चालणार नाही असं मत समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले आहे. मुलींनी कमजोर का असावं, ती निर्बल असेल तर तिच्यावर दबाव येणारच, त्यामुळे तिने सबळ होणे आवश्यक आहे. तसेच काही काळजी देखील घेणे आवश्यक असल्याचे सिंधूताई सपकाळ यांनी म्हटलय.

संस्कार राहिले नाहित, दबाव राहिला नाही. मायबापाचे मुली ऐकत नाहीत. हम करे सो कायदा असे त्यांचे वर्तन असते असं सिंधूताई म्हणाल्या. लहाणपणापासूनच मुलांना संस्कार दिले पाहिजे. आता आईचं उगडे-नागडे कपडे घालत असेल तर मुलीने काय आदर्श घ्यायचा असा प्रश्न त्यांनी केला. तसेच, इतिहासातील कर्तृत्वान स्रियांनी नेहमीच आपली संस्कृती जपली. त्या नेहमी नऊवारीतच वावरल्या. राजमाता जिजाऊ असो की, अहिल्याबाई किंवा मग सावित्रीबाई फुले असो एव्हढं कर्तृत्व गाजवूनही त्यानी कधी पदर ढळू दिला नाही असं त्या म्हणाल्या. काळानुसार मुलींनी जरूर बदलावं पण पुरूषाच्या भावना चाळवेल असे कपडे घालू नये असं सिंधूताई यावेळी म्हणाल्या.