Home मनोरंजन ‘तुम्ही सगळे राक्षस आहात’ करोना काळात बनावट औषधं विकणाऱ्यांवर भडकला फरहान अख्तर

‘तुम्ही सगळे राक्षस आहात’ करोना काळात बनावट औषधं विकणाऱ्यांवर भडकला फरहान अख्तर

0
‘तुम्ही सगळे राक्षस आहात’ करोना काळात बनावट औषधं विकणाऱ्यांवर भडकला फरहान अख्तर

[ad_1]

हायलाइट्स:

  • करोना काळात बनावट औषधांची होतेय विक्री
  • बनावट औधष विकून केली जातेय लोकांची फसवणूक
  • अभिनेता फरहान अख्तरनं बनावट औषधं विकणाऱ्यांना सुनावलं

मुंबई: भारतात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनं धुमाकूळ घातला आहे. समान्य माणसांपासून ते बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत अनेकांना या दुसऱ्या लाटेचा फटका बसला असून या व्हायरसमुळे अनेकांचं निधन झालं आहे. यासोबतच देशात करोनाची औषधं आणि रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन सिलेंडर यांची कमतरता भासत आहे. अशात काही लोक करोनाची बनावट औषधं तयार करून विकत असल्याची माहिती समोर आली आहे आणि यावर अभिनेता फरहान अख्तरनं नाराजी व्यक्त केली आहे.

फरहान अख्तरनं अशाप्रकारे बनावट किंवा चुकीची औषधं विकणाऱ्यांवर टीका करत एक ट्वीट केलं आहे. त्यानं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘मी एक न्यूज रिपोर्ट पाहिला ज्यात काही लोक करोनाची बनावट औषधं तयार करून विकत असल्याचं समजलं. अशा कठीण काळात लोकांचा विश्वासघात करण्यासाठी तुम्हाला एका खास प्रकारचा राक्षस होणं गरजेच आहे. तुम्ही सर्व माणसं नाही राक्षस आहात तुम्हाला असं करण्याआधी लाज वाटायला हवी.’

फरहान अख्तरनं करोना रुग्णांनाही मदतीचा हात दिला आहे. सोशल मीडियावर त्यानं काही एनजीओंची यादी दिली आहे. जे करोनाच्या रुग्णांना मदत करतात. यासोबत त्यानं लिहिलं, ‘मी तुमच्यासोबत एनजीओंची यादी शेअर करत आहे. जी करोना विरुद्धच्या या लढाईमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकेल. याच्या माध्यमातून आपण ऑक्सिजनपासून ते रुग्णवाहिकेपर्यंत सर्वप्रकारची मदत लोकांना करू शकतो.’

[ad_2]

Source link