Home मनोरंजन तुरुंगातून सुटलेल्या शायनी आहुजाला केआरकेने ऑफर केला होता चित्रपट, ट्वीट आलं चर्चेत

तुरुंगातून सुटलेल्या शायनी आहुजाला केआरकेने ऑफर केला होता चित्रपट, ट्वीट आलं चर्चेत

0
तुरुंगातून सुटलेल्या शायनी आहुजाला केआरकेने ऑफर केला होता चित्रपट, ट्वीट आलं चर्चेत

[ad_1]

हायलाइट्स:

  • केआरकेने शायनी आहुजाबद्दल केला आणखी एक खुलासा
  • यापूर्वी दिली होती बॉलिवूडची गुपितं उघड करण्याची धमकी
  • केआरकेच्या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई– स्वतःला चित्रपट समीक्षक म्हणवणारा केआरके म्हणजेच कमाल आर खान बॉलिवूडबद्दल एकापाठोपाठ एक खुलासे करत आहे. सलमानने केआरकेवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. सलमानच्या ‘राधे’ चित्रपटाबद्दल वाईट बोलल्यामुळे आपल्यावर हा खटला दाखल करण्यात आल्याचं केआरकेने म्हटलं होतं. सध्या केआरके ट्विटरवर प्रचंड सक्रिय झाला आहे. आता आणखी एक खुलासा करत केआरकेने अभिनेता शायनी आहुजाला चित्रपट ऑफर केल्याचं म्हटलं आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आपण शायनीला परिस्थितीची जाणीव करून देत चित्रपटाची ऑफर दिल्याचं केआरकेने म्हटलं आहे.

मोस्ट डिझायरेबल वुमनच्या यादीत रिया चक्रवर्ती पहिल्या स्थानावर

बॉलिवूड अभिनेता शायनी आहुजा गेली अनेक वर्ष तुरुंगात होता. शायनीवर घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. केआरकेने ट्वीट करत म्हटलं, ‘जेव्हा शायनी तुरूंगातून बाहेर आला तेव्हा मी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये त्याची भेट घेतली. मी त्याला एका चित्रपटाची ऑफर दिली जो मी दिग्दर्शित करणार होतो. पण शायनीने माझा चित्रपट करायला नकार दिला. मी त्याला म्हटलं की, आता तुला कोणीही काम देणार नाही. पण त्याने माझं काहीच ऐकलं नाही. तो मला म्हणाला की, भट्ट साहेब आणि मधुर भांडारकर यांनी त्याला सांगितलं आहे की तू तुझ्या न्यायालयातील केसकडे लक्ष दे मग आम्ही तुझ्या बॉलिवूडमधल्या केसकडे लक्ष देतो.’

यापुढे बॉलिवूडचं सत्य सांगत केआरकेने लिहिलं, ‘मी त्याला म्हटलं की, ते सगळे खोटं बोलतायत. तुझं बॉलिवूडमधलं करिअर आता संपलय. आज बघा शायनीला कोणत्याही चित्रपटात काम मिळत नाहीए. हाच तर मूळ मुद्दा आहे. बॉलिवूडमध्ये कोणालाही सत्य ऐकायचं नाहीये. प्रत्येकजण आपल्या स्वप्नांच्या दुनियेत जगतो.’ केआरकेच्या या ट्वीटनंतर युझर्सदेखील ट्वीट करत त्याला प्रतिक्रिया देत आहेत. मागील एका ट्वीटमध्ये केआरकेने म्हटलं होतं की तो हा देश सोडून निघून जाईल आणि मग बॉलिवूडमधील प्रत्येकाची गुपितं सगळ्यांसमोर उघड करेल. त्यानंतर त्याला कोणीही अडवू शकणार नाही.

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आहे या स्पर्धकाची चाहती

[ad_2]

Source link