Home गुन्हा तुळींज या पोलीस ठाणेकडुन गावठी दारुविक्री करणा-याआरोपीतांवर कारवाई

तुळींज या पोलीस ठाणेकडुन गावठी दारुविक्री करणा-याआरोपीतांवर कारवाई

0

पुणे : परवेज शेख

मुंबई : शफीक शेख तुळींज या पोलीस ठाणेकडुन गावठी दारुविक्री करणा-याआरोपीतांवर कारवाई

पालघर जिल्हयात दिनांक १६/१०/२०१९ रोजी तुळींज या पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य दारु धंदयावर पोलीसांनी ०५ वेगवेगळया ठिकाणी कारवाई करुन आरोपीत यांचे ताब्यातुन १)६५०००/- रु.एकुण १३ प्लॅस्टीकचे निळया व पोपटी रंगाचे ड्रम प्रत्येक ड्रम मध्ये २०० लिटर गावठी दारु बनविण्याचे रसायन असे एकुण २६०० लिटर रसायन २)२५००/ रु एकुण ०१ काळया रंगाचे दारु बनविण्याचे भांडे त्यात १०० लिटरदारु बनविण्याचे रसायन ३)२,५५०/- रु पिवळया व निळया रंगाचे ०२ प्लॅस्टीकचा कॅन त्यामध्ये ५५ लिटर गैरकायदा गावठी

हातभट्टीची दारु ४)१४००/-. एक प्लास्टिकचा निळया रंगाचा ड्रम त्यात ३५ लिटर गावठी हातभटटीची दारु ५)२०/- रु. एक प्लास्टिकचा जग ६)२०/- रु. २ काचेचे ओलसर ग्लास अग्र वासाचा असा एकुन ७६,२७०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीत यांचेविरुध्द तुळींज पोलीस ठाणे येथे मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री. डी. एस. पाटील प्रभारी अधिकारी तुळींज पोलीस ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली तुळींज पोलीस ठाणे चे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.