Home ताज्या बातम्या तुषार गांधींचा कार्यक्रम रद्द ; हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावामुळे रद्द केल्याचा आरोप

तुषार गांधींचा कार्यक्रम रद्द ; हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावामुळे रद्द केल्याचा आरोप

0

पुणे :पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात री-व्हिजिटिंग गांधी या कार्यक्रमात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना दिलेले निमंत्रण रद्द केल्याने गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर हे निमंत्रण हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावाने रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मॉडर्न महाविद्यालयाने मिळून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याच्या उदघाटनासाठी गांधी आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त अन्वर राजन यांना आमंत्रित केले होते. मात्र काही संघटनांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आमंत्रण रद्द करण्यात आले. गांधी यांनी ट्विटरवरून याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष गजाजन एकबोटे यांनी मात्र याविषयी भूमिका मांडतांना व्याख्यान रद्द नाही तर स्थगित केल्याचे सांगितले. विद्यापीठ आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने हा कार्यक्रम आहे

त्यासाठी विद्यापीठाने फंडिंग दिलेले आहे.पतित पावन संघटने काही मुले आमच्याकडे आली. त्यांचे म्हणणे होते की विद्यापीठाच्या फंडिंग राजकीय भूमिका प्रदर्शित करणारे कार्यक्रम नको.त्यामुळे पाच हजार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाप्रश्न नको म्हणून आम्ही हा कार्यक्रम रद्द केला. मात्र संस्थेच्या फंडिंग मधून गांधींचा कार्यक्रम आयोजित करेन असेही त्यांनी स्पष्ट केले.