हायलाइट्स:
- तेजश्रीने अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मनं
- मैत्रिणीसोबत तेजश्रीने सुरू केली स्वतःची निर्मिती संस्था
- चाहत्यांसह कलाकारांनी तेजश्रीवर केला शुभेच्छांचा वर्षाव
VIDEO: दिलीप कुमार यांच्या घराबाहेर आलेली ती वृद्ध महिला कोण? नातेवाईक असल्याचा करतेय दावा
‘टेक ड्रीम्स प्रोडक्शन‘ असं तेजश्रीच्या निर्मिती संस्थेचं नाव असून ही संस्था तेजश्री आणि तिच्या मैत्रिणीने मिळून सुरू केली आहे. तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. पोस्ट शेअर करत तेजश्रीने लिहिलं, ‘माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी काहीतरी खास आहे. मी आणि माझी मैत्रीण कीर्ती नेरकर नेहमीच काहीतरी वेगळं करण्याबद्दल बोलायचो, आमच्या आवडीचा कन्टेन्ट तयार करण्याबद्दल आणि असं काहीतरी लिहिण्याबद्दल जे जादुई असेल. अखेरीस आमच्या रोज रात्रीच्या बोलण्याला, विचारांच्या देवाणघेवाणीला, कल्पनांना आणि स्वप्नांना एक चेहरा मिळालाय. मला आमचं स्वप्न तुमच्यासमोर सादर करायला प्रचंड आनंद होतोय… आमची निर्मिती संस्था ‘टेक ड्रीम्स प्रोडक्शन’.
यासोबत तेजश्रीने चाहत्यांना त्याचं प्रेम आणि आशीर्वाद कायम तिच्यासोबत ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तेजश्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. इतर कलाकारांनीही तेजश्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यापूर्वी तेजश्री ‘अगंबाई सासूबाई’ मालिकेत शुभ्राच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय तेजश्रीचा बॉलिवूड चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.