हायलाइट्स:
- राहुल आणि दिशाने लग्नासाठी एकमेकांना दिले स्पेशल गिफ्ट
- राहुल वैद्य आणि दिशा परमार १६ जुलै रोजी होणार विवाहबद्ध
- लग्नसोहळ्यामध्ये ५० वऱ्हाडी होणार सहभागी
या दोघांचा एकमेकांचे हातात हात घेतलेला क्लेचा मोल्ड भावना जसरा यांनी तयार केला आहे. क्लेचा हा मोल्ड तयार करतानाचे फोटो आणि व्हिडीओ भावनाने तिच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन दोघांनी देत, त्यांनी एकमेकांना लग्नाचे गिफ्ट म्हणून हा क्ले तयार केला आहे.
दोघांच्याही हाताचा क्ले तयार करताना व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर झाला आहे. या व्हिडीओमध्ये राहुलने दिशासाठी ‘तेरे हाथ में मेरा हाथ हो…’ हे रोमँटिक गाणे गायले आहे.
दीपिका आणि रणवीरने देखील बनवला होता असा क्ले
भावना जसरा यांनी याआधी दीपिका पादुकोन आणि रणवीर यांचा हातात हात घेतलेला क्ले मोल्ड तयार केला होता. सोने, चांदी, ब्रांझ पासून हे असे मोल्ड तयार करण्यात भावना माहिर आहेत.
राहुल- दिशाच्या लग्नात ५० वऱ्हाडी
राहुल आणि दिशाच्या लग्नामध्ये केवळ ५० जणांना सहभागी होता येणार आहे. त्यांच्या लग्नाबद्दल राहुलने सांगितले की, ‘करोनामुळे लग्न सोहळ्या अगदी मोजक्या आणि जवळच्या मित्रमंडळींना बोलावण्यात आले आहे.’ या दोघांच्या संगीत कार्यक्रमाला अली गोनी, तोशी सबरी, मीका सिंग, विंदू दारा सिंग हे परफॉर्म करणार आहेत. अलिकडेच या दोघांच्या संगीत कार्यक्रमाच्या रिहर्सलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये राहुल आणि दिशा एका रोमँटिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.