…तेव्हा शाहरुखने गौरीला सांगितलं होतं बुरखा घाल आणि नावही बदल

…तेव्हा  शाहरुखने  गौरीला सांगितलं  होतं बुरखा घाल आणि नावही बदल
- Advertisement -


मुंबईछ चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना दिल्लीतून आलेला एक हरहुन्नरी ‘दिवाना’ मुंबईत बॉलिवूडचा ‘बादशहा’ बनला. पन्नाशी ओलांडली तरीही तो ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडमधील आदर्श जोडपं म्हणून शाहरुख आणि गौरी यांच्याकडे पाहिलं जातं.

धर्माच्या भींती तोडून शाहरुख आणि गौरीनं लग्न केलंय. दोघांचे धर्म वेगळे असल्यानं लग्नासाठी विरोध होणार, अडचणी येणार हे माहिती होतंच, तरीही शाहरुख आणि गौरीनं एकमेकांची सोबत कधीही सोडली नाही. शाहरुखनं गौरीला कधीही धर्म बदलण्यासाठी सांगितलं नाही, किंवा नाव बदलण्याचा आग्रह केला नाही, असं असलं तरी गौरीला बुरख्यात राहावं लागेलं, अशी सक्ती त्यानं केली होती. यासंदर्भातला एक किस्सा त्यानं एका मुलाखतीदरम्यान शेअर केला.


शाहरुख मुस्लिम ,तर गौरी हिंदू असल्यानं दोघांच्या लग्नात बऱ्याच चर्चा सुरू होत्या. त्यांच्या रिसेप्शनचा एक किस्सा शाहरुखनं सांगितला. दोघांच्या रिसेप्शमध्ये एकाच गोष्टीची चर्चा सुरू होती, ती म्हणजे धर्म परिवर्तनाची. या सगळ्या गोष्टी शाहरुखच्या कानावर आल्या. त्यानंतर तो गौरीला घेऊन तिच्या कुटुंबियांकडे केला. म्हणाला, गौरी चल बुरखा घाल..आपल्याला नमाज पठण करायचं आहे. आणि आता तुझं नाव गौरी नाहीतर आयशा असणार आहे. शाहरुख एवढ्यारंच थांबला नाही तर, गौरी आता घरातच थांबणार असं सांगून टाकलं’. शाहरुखचं हे सगळं बोलणं ऐकूण गौरीच्या घरचे एकद हैराण झाले. त्यांनी चिंताही व्यक्त केली. परंतु हे सर्व मुद्दाम मस्करीत बोलल्याचं नंतर शाहरुखनं गौरीच्या कुटुंबियांना सांगितलं. यानंतर सर्वचं जणं खळखळून हसले.

गौरी आणि शाहरुख या दोघांनीही नेहमीच एकमेकांच्या धर्माचा आदर केला आहे. त्यांच्या मन्नत बंगल्यावरही दोन्ही धर्माचे सण साजरे केले जातात.काही महिन्यांपूर्वी एका व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यातही हे दिसून आलं होतं. चाहत्यांनी व्हिडिओत गणपतीची मुर्ती आणि कुरान असल्याचं पाहिलं. यानंतर यासंबंधी अनेक ट्वीट आले. एका चाहत्याने लिहिले की, ‘गणेशही मिळेल आणि कुराणही मिळेल.. हे शाहरुखचं मन्नत आहे साहेब. इथे तुम्हाला प्रत्येक धर्म मिळेल.’





Source link

- Advertisement -