Home ताज्या बातम्या तोंडाच्या कर्करोगाचा खर्चही जीवघेणा

तोंडाच्या कर्करोगाचा खर्चही जीवघेणा

0
तोंडाच्या कर्करोगाचा खर्चही जीवघेणा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
आणि तंबाखूजन्य पदार्थ खाण्यामुळे होण्याचे प्रमाण जागतिक पातळीवरही वाढले आहे. यावरील उपचारांचा खर्च रुग्णांच्या कुटुंबीयांना सहन करावा लागतो, त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्थेवरही ताण निर्माण करतो. टाटा कर्करोग रुग्णालयाने केलेल्या अभ्यासात तोंडाच्या कर्करोगमध्ये दहा टक्के रुग्णांमध्ये पुढील टप्प्यात निदान होते, त्यामुळे उपचार देणे शक्य होत नाही. अशावेळी या रुग्णांना केवळ लक्षणाधारित उपचार देणे शक्य होते, असेही डॉक्टरांनी सांगितले.

टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी अशा रुग्णांचे कुटुंबावर असलेले अवलंबित्व वाढते. या रुग्णांकडे वैद्यकीय विमा योजनाही नसतात. त्यामुळे त्यांच्यावर येणारा ताण हा असह्य असतो. कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये हे रुग्ण व त्यांचे कुटुंबीय अडकून जातात. मुखाचा कर्करोग असलेल्या ६० ते ८० टक्के रुग्ण हे आजार पुढच्या टप्प्यात असताना कर्करोगतज्ज्ञांकडे जातात. भारताने २०२०मध्ये २,३८६ कोटी रुपये तोंडाच्या कर्करोगच्या उपचारासाठी खर्च केले आहेत. यात विमा योजना, सरकारी आणि खासगी क्षेत्र, धर्मादाय संस्थामधून मिळालेली मदत असा एकूण खर्चाचा समावेश आहे. त्यामुळे पुढील दहा वर्षांसाठी देशावरील आर्थिक भार हा २३,७२४ कोटी रुपयांनी वाढणार आहे.

सर्व प्रकारचे तोंडाचे कर्करोग हे तंबाखू तसेच सुपारीच्या सेवनामुळे होतात. त्यामुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरूपातील तंबाखूचे सेवन टाळणे गरजेचे आहे. तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे.

-डॉ. पंकज चतुर्वेदी

उपकरणांच्या किंमतीही वाढल्या
टाटा कर्करोग रुग्णालयातील अभ्यासक डॉ. अर्जुन सिंग यांनी तोंडाच्या कर्करोगवर प्रगत टप्प्यामध्ये उपचार करण्याचा खर्च हा २ लाख २ हजार ८९२ रुपये इतका आहे, असे सांगितले. त्यामुळे यापूर्वी असलेल्या खर्चाच्या प्रमाणात ४२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सीटी, एमआरआय, पेट स्कॅन यासारख्या वैद्यकीय उपकरणामधील गुंतवणूकही वाढली आहे तर शस्त्रक्रियेच्या उपकरणांची किंमतही पूर्वीपेक्षा १.४ पटीने अधिक झाल्याचे दिसते. केमो आणि रेडिओथेरपीच्या वैद्यकीय उपचारपद्धतीमध्ये ४४.६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे हा अभ्यास सांगतो.

Source link