हायलाइट्स:
- या कारणामुळे महक चहल आणि अश्मित पटेलचे ब्रेकअप
- पाच वर्षे होते रिलेशनमध्ये, साखरपुडाही केला होता
- खतरों के खिलाडी ११ मध्ये महक होणार सहभागी
महकने ई- टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘अश्मितबरोबर ब्रेकअप झाल्याचे दुःख नाही. त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय मी घेतला होता. अर्थात तो निर्णय मला नाईलाजाने घ्यावा लागला होता. कारण जेव्हा आपण एकाद्या व्यक्तीसोबत राहू लागतो, त्याला अधिक जवळून ओळखू लागतो. तेव्हाच त्याचे गुण-अवगुण समजायला लागतात. यातून अश्मित हा माझ्यासाठी योग्य नव्हता असा निष्कर्ष माझ्यासमोर आला. लग्नानंतर पश्चाताप होण्याआधी काही गोष्टी आधीच स्पष्ट केलेल्या योग्य असतात. त्यामुळे मी त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.’
‘अर्थात हा निर्णय घेतल्यानंतरचे दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते. परंतु माझ्या कुटुंबाने आणि माझ्या मित्रमैत्रिणी मोलाची साथ दिली त्यामुळेच यातून मी बाहेर येऊ शकले. हे सगळे झाल्यानंतर संपूर्ण एक वर्ष मी गोव्यामध्ये होते. या प्रकरणातून संपूर्ण सावरल्यानंतर आता मी मुंबईत परतले आहे. झालेल्या जखमा बऱ्या करण्याची ताकद काळामध्ये असते. त्यामुळे काळानुसार माझ्या जखमा भरल्या आहेत. आता मी पूर्णपणे यातून बाहेर आली असून मी एकदम व्यवस्थित आहे.’
महक पुढे म्हणाली, ‘अश्मितबरोबर ब्रेकअप नसते झाले तर मी गोव्याला गेले नसते. परंतु मी गोव्याला गेले… तिथे गेल्यानंतर भटकले आणि त्यामुळेच यातून मला सावरायला खूपच मदत झाली.’ अश्मित आणि महक यांनी २०१७ मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर त्यांच्यात पटेनासे झाल्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान महक आता ‘खरतरों के खिलाडी ११’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात राहुल वैद्य, अभिनव शुक्ला, अर्जुन बिजलानी, निक्की तंबोली, सनाया ईराणी, वरुण सूद आणि विशाल आदित्य सिंह हे देखील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राहुल वैद्यने सर्वात जास्त मानधन घेतले आहे.