हायलाइट्स:
- मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहे टायगर- दिशाच्या नात्याची चर्चा
- टायगर श्रॉफच्या कुटुंबासोबत आहे दिशाचं खूप चांगलं बॉण्डिंग
- टायगरचे वडील जॅकी श्रॉफ यांनी मुलाच्या रिलेशनशिपवर दिली प्रतिक्रिया
एका हिंदी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफ म्हणाले, ‘माझ्या मुलानं वयाच्या २५ व्या वर्षापासून डेटिंग करायला सुरुवात केली. ते चांगले मित्र आहेत. मला माहीत नाही त्यांनी त्यांच्या भविष्याबद्दल काय विचार केला आहे. पण मला एक गोष्ट माहीत आहे ती म्हणजे या सर्व गोष्टींमुळे टायगरचं कामाकडे दुर्लक्ष अजिबात होणार नाही. माझ्यासाठी त्याचं काम सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्याआधी काहीच नाही. मग ती त्याची आई असो, बहीण असो किंवा मग गर्लफ्रेंड. तो आणि त्याचं काम यात कोणीच अडथळा होऊ शकत नाही. त्याचं त्याच्या कामावर व्यवस्थित लक्ष आहे आणि हीच सर्वात चांगली गोष्ट आहे.’
टायगरची बहीण कृष्णा देखील दिशा पाटनीची खूप चांगली मैत्रीण आहे. टायगरच्या रिलेशनशिपबद्दल बोलताना कृष्णा म्हणाली, ‘मला नेहमीच माझ्या भावाची काळजी असते. पण शेवटी तो एक तरुण आहे आणि एवढा मोठा तर नक्कीच झाला आहे की, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकेल. त्याला माहीत आहे त्याच्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट आहे असं मला वाटतं. तो खूप समजदार आहे आणि त्याच्या आनंदातच माझाही आनंद आहे. मला नाही वाटतं मला माझ्या भावाला काही सल्ला देण्याची गरज आहे. तो खूप खंबीर आणि त्याच्या निर्णयांबाबत स्पष्ट आहे.’
जॅकी श्रॉफ किंवा कृष्णा टायगरच्या रिलेशनशिपबद्दल बोलताना दिशाचं नाव घेत नसले तरीही टायगरच्या संपूर्ण कुटुंबाशी दिशाचं चांगलं बॉण्डिंग आहे. मागच्याच आठवड्यात दिशानं तिचा वाढदिवस टायगर श्रॉफ आणि त्याच्या बहिणीसोबत साजरा केला. दिशानं तिच्या इन्स्टाग्रामवर या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते. याशिवाय इन्स्टाग्राम स्टोरीवर तिनं टायगरची आई आयशा श्रॉफ यांची स्वीट नोटही शेअर केली होती. ज्यात त्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.