हायलाइट्स:
- अभिनेत्री सुश्मिता सेन तिचं खासगी आयुष्य आणि रिलेशनशिपमुळे नेहमीच असते चर्चेत
- मॉडेल रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे सुश्मिता सेन
- सुश्मिताच्या बॉयफ्रेंडवरून एकमेकांशी सोशल मीडियावर भिडले चाहते
सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात सुश्मिता सेन तिची मुलगी अलिशासोबत दिसत असून या दोघांसोबत रोहमनसुद्धा दिसत आहे. पण या फोटोंमध्ये रोहमन सुश्मिताची बॅग पकडून उभा असलेला दिसत आहे. रोहमनची हिच गोष्ट काही युझर्सना पसंत पडलेली नाही. ज्यावरून काही युझर्सनी त्याच्यावर टीका करायला आणि उपरोधिक बोलायला सुरुवात केली आहे.
एका युझरनं लिहिलं, ‘हा काय नेहमीच सुश्मिताची बॅग घेऊनच चालत असतो का? कधी कधी ठीक आहे पण हा तर नेहमीच दिसतो. कृपया पुरुषांसारखं वाग.’ आणखी एका युझरनं लिहिलं, ‘तिची बॅग म्हणजे रोहमनचं करिअर आहे का?’ अर्थात एकीकडे काही युझर्स रोहमनची खिल्ली उडवत असले तरीही काही लोकांनी मात्र रोहमनच्या वागण्याचं कौतुक केलं आहे. रोहमनची खिल्ली उडवणाऱ्या युझर्सना उत्तर देत एका युझरनं लिहिलं, ‘तुमचं पुरुषत्त्व एवढं कमकुवत आहे कि एका पुरुषाच्या हातात स्त्रीची बॅग पाहिल्यावर उध्वस्त झालं?’
सुश्मिता आणि रोहमन मागच्या काही काळापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. दोघंही सर्वांसमोर आपल्या प्रेमाचा स्वीकर करताना दिसतात. एवढंच नाही तर सुश्मिताच्या मुली रिनी आणि अलिशासोबतही रोहमनचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. सुश्मिता नेहमीच त्यांचे फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.