हायलाइट्स:
- दाक्षिणात्य निर्मात्याने नीना यांना दिली होती सोबत झोपण्याची ऑफर
- हॉटेल रूममधून पळून आल्या होत्या नीना
- मनात नसतानाही रूमवर गेल्या होत्या नीना
राज परफेक्ट आहे पण, एक गोष्ट त्याला जमत नाही; शिल्पा शेट्टीनं केला खुलासा
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांना भेटल्या होत्या नीना
नीना यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं की, जेव्हा त्यांना चित्रपट निर्मात्याने हॉटेल रूममध्ये बोलावलं तेव्हा त्यांचं शरीर थंड पडलं होतं. निर्मात्याने नीना यांना स्पष्ट शब्दात त्याच्यासोबत एक रात्र घालवण्याची ऑफर दिली होती. हा निर्माता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील होता. त्यावेळेस नीना मुंबईतील जुहू येथील पृथ्वी थिएटरमध्ये काम करत होत्या. नीना कामासाठी निर्मात्याला भेटण्यासाठी हॉटेलवर गेल्या होत्या. जेव्हा निर्मात्याने नीना यांना बाहेर भेटण्याऐवजी एका हॉटेलच्या रूममध्ये बोलावलं तेव्हा त्यांना ही गोष्ट खटकली होती.
मनात नसतानाही नीना रूमवर गेल्या
नीना यांनी त्या प्रसंगाबद्दल सांगताना लिहिलं, ‘माझं मन मला सांगत होतं की हॉटेलमधील रूमवर जाणं माझ्यासाठी योग्य नाहीये. मी त्याला खाली हॉटेलच्या लॉबीमध्ये यायला सांगणार होते. पण ही अशी वेळ होती की, मला ती संधी सोडायची नव्हती. मी वर खोलीत गेले. मी त्यांना विचारलं माझी भूमिका काय असणार आहे? त्यावर ते म्हणाले की, तुला अभिनेत्रीच्या मैत्रिणीची भूमिका करायची आहे. त्यानंतर मी जायला उठले तर त्यांनी मला सरळ प्रश्न विचारला की, ‘तू कुठे जातेस? तू आजची रात्र माझ्यासोबत घालवणार नाहीयेस?’ हे प्रश्न ऐकून मला काही सुचेनासं झालं आणि मी तिथून अक्षरशः पळून आले. तो अनुभव माझ्यासाठी प्रचंड धक्कादायक होता.’
‘मर्द बनो’ संजय दत्तचा जुना व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल