उस्मानाबाद , प्रतिनिधी दिनांक ९ : अल्पवयीन भोळसर मुलीवर वारंवार बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधमास न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बेंबळी (ता. उस्मानाबाद) पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करून शनिवारी (८ जानेवारी) न्यायालयासमोर हजर केले होते.
अल्पवयीन वेडसर मुलीवर तिच्या हालाकीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन वारंवार अत्याचार केला होता. त्यातून ती गर्भवती राहिली आहे. ही बाब तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ हालचाली करत गुन्हा नोंद करून आरोपीला गजाआड केले होते. शनिवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता गुरुवार (१३ जानेवारी) पर्यंत त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यास या प्रकरणाचे तपास अधिकारी तथा भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही. के. खांबे यांनी दुजोरा दिला.