हायलाइट्स:
- अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आज पहिली पुण्यतिथी
- मागच्या वर्षी १४ जून रोजी सुशांतनं राहत्या घरीच केली होती आत्महत्या
- २०१९ च्या युरोप टूरनंतर सुशांतचं वागणं बदलल्याचा रिया केला होता दावा
सुशांतसिंह राजपूत आणि त्याची गर्लफ्रेंड ऑक्टोबर २०१९ रोजी युरोप टूरवर गेले होते. या टूरच्या वेळी रियाचा भाऊ शौविकसुद्धा त्यांच्यासोबत होता. या टूर दरम्यान इटलीतील एका ६०० वर्ष जुन्या हॉटेलमध्ये ते थांबले होते. या हॉटेलच्या रुम खूप प्रशस्त आणि त्यांच्या भिंतींवर काही जुनी पेंटिंग लावलेली होती. रियाच्या म्हणण्यानुसार ही पेंटिग्स पाहिल्यावर सुशांत घाबरला होता. त्यानंतर त्याचं वागणंही बदललं.
रियानं सांगितलं, युरोप टूर दरम्यान आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. तिथे सुशांतच्या रुममध्ये एक पेंटिंग होतं या पेंटिंगमध्ये सॅटर्न आपल्याच मुलाला खाताना दाखवला होता. मी त्यावेळी माझ्या भावासोबत दुसऱ्या रुममध्ये होते. पण जेव्हा आम्ही दोघं सुशांतच्या रुममध्ये गेलो त्यावेळी तर तो हातात रुद्राक्ष घेऊन काही मंत्रांचा जप करत असलेला दिसला. तो खूप घाबरला होता.
रिया पुढे म्हणाली, ‘मी त्याला काय झालं असं विचारलं. त्यावर त्यानं मी या पेंटिंगमधले कॅरॅक्टर्सना पाहू शकतोय असं सांगितलं होतं.’ रियाच्या म्हणण्यानुसार या पेंटिंगमुळे सुशांतला विचित्र गोष्टी नजरेसमोर येऊ लागल्या होत्या. पण त्याला व्यवस्थित काहीच सांगता येत नव्हतं. त्या दिवशी रिया आणि शौविक त्याच्यासोबत त्याच्याच रुममध्ये झोपले. रियानं सांगितलं की, ‘सुशांतला ते पेंटिंग पाहिल्यावर भास होऊ लागले होते. त्याला आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला की, हा फक्त भास आहे बाकी काहीच नाही.’
या घटनेनंतर सुशांत आणि रिया ऑस्ट्रियामधल्या एका डेटॉक्स सेंटरमध्येही गेले होते. पण त्या ठिकाणीही सुशांतला ठीक वाटत नसल्यानं ते दोघंही परत आले. रियानं सांगितलं की त्यांची ही टूर २ नोव्हेंबरला संपणार होती. पण त्याआधीच २८ ऑक्टोबरला सर्वजण भारतात परतले होते. या टूरवरून परत आल्यानंतर सुशांतची एनर्जी अचानक कमी झाली होती. तो तासंतास एकटा शांत बसू राहत असे. मुंबईला आल्यावर त्याची तब्येत अधिकच बिघडली तो कधीही ओरडत असे, अचानक रडू लागत असे.
रियानं ज्या पेंटिंगचा उल्लेख केला आहे. ते पेंटिंग प्रसिद्ध चित्रकार फ्रान्सिस्को डी गोया यांचं आहे. गोया हे स्पेनमधील नावाजलेले चित्रकार होते. एका ग्रीक पारंपरिक कथेच्या आधारावर त्यांनी ही पेंटिंग तयार केली होती. ज्यानुसार क्रोनस आपल्याला आपल्याच मुलांकडून हार पत्कारावी लागेल या भीतीनं आपल्या मुलांना खाऊन टाकतो. हेच त्या पेंटिंगमध्ये दाखवण्यात आलं आहे. गोया यांनी हे पेंटिंग स्वतःच्याच घराच्या भिंतींवर काढले होते. त्यानंतर त्याला फ्रेमचं स्वरुप देण्यात आलं.