Home मनोरंजन थट्टा नकोच- रजा मुराद यांच्या एका अफवेमुळे शरत सक्सेना यांचं झालेलं अफाट नुकसान

थट्टा नकोच- रजा मुराद यांच्या एका अफवेमुळे शरत सक्सेना यांचं झालेलं अफाट नुकसान

0
थट्टा नकोच- रजा मुराद यांच्या एका अफवेमुळे शरत सक्सेना यांचं झालेलं अफाट नुकसान

[ad_1]

हायलाइट्स:

  • बॉलिवूडमध्ये मिळाल्या नाहीत खलनायकाच्या भूमिका
  • बॉलिवूडमध्ये कायम झाला पंचिंग बॅग प्रमाणे वापर
  • रजा मुराद यांच्या एका अफवेमुळे झालं शरत यांचं नुकसान

मुंबई– बॉलिवूड अभिनेते शरत सक्सेना नुकतेच अभिनेत्री विद्या बालनसोबत ‘शेरनी’ चित्रपटात झळकले. वयाच्या ७२ व्या वर्षीही शरत यांची फिट फिजिक पाहून चाहत्यांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. शरत यांच्या पात्राचं प्रचंड कौतुक करण्यात आलं. परंतु, आता मिळत असलेला मान-सन्मान यापूर्वी बॉलिवूडमध्ये मिळाला नसल्याची खंत शरत यांनी व्यक्त केली आहे. बॉलिवूडमध्ये कायमचं दुय्यम वागणूक देण्यात आली आणि एखाद्या पंचिंग बॅगप्रमाणे वापर करण्यात आला असल्याचं शरत यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर BMC आधी मनसेने चिकटवलं पोस्टर

बॉलिवूडमध्ये कधीही मिळालं नाही खलनायकाचं पात्र

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडकडून मिळालेल्या वागणुकीबद्दल सांगताना शरत म्हणाले, ‘मी नेहमीच एक भरदार शरीरयष्टी असणारा व्यक्ती होतो. त्यामुळे मला चित्रपटात मारामारी करणारी पात्र मिळायची. मी स्क्रीनवर खूप मारामाऱ्या करायचो पण मला कधीही मुख्य खलनायकाचं पात्र मिळालं नाही. मला तो सन्मान मिळाला नाही ज्यासाठी मी पात्र होतो. मला नेहमीच खलनायकाच्या हाताखालच्या माणसाचं काम मिळालं. हिरो यायचा आणि मला मारून निघून जायचा. बॉलिवूडसाठी मी फक्त एक पंचिंग बॅग होतो.’

रजा मुराद यांच्या अफवेमुळे झालं कामाचं नुकसान

रजा मुराद यांच्याबद्दल सांगताना शरत म्हणाले, ‘बॉलिवूडमध्ये मुख्य पात्र मिळत नसल्याने मी दाक्षिणात्य चित्रपटात काम करू लागलो. तिथे मला खलनायकाच्या भूमिका मिळू लागल्या. एके दिवशी मला माहीत झालं की आमिर खानने ‘गुलाम’ चित्रपटासाठी माझं नाव सुचवलं होतं. परंतु, एका व्यक्तीने मी बॉलिवूड सोडून चैन्नईला शिफ्ट झाल्याची अफवा पसरवली होती त्यामुळे मला त्या भूमिकेसाठी विचारणा देखील झाली नाही. ती व्यक्ती होती रजा मुराद. त्यांच्या अफवेमुळे सगळ्यांना वाटत होतं की मी बॉलिवूडमध्ये काम करणं सोडलं आहे. त्यामुळे माझ्या कामाचं फार नुकसान झालं.’

करिना विरोधात तक्रार दाखल, धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप

[ad_2]

Source link