दक्षिण भारतात बँकांना टार्गेट करणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांना केलं जेरबंद

- Advertisement -

कोल्हापूर : दक्षिण भारतात बँकांना टार्गेट करणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांना जेरबंद करण्यात यश आल आहे. या टोळीतील चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गावठी बनावटीचे दोन कट्टे, 15 जिवंत काडतुसे, 93 हजार रुपयांची 10 आणि 5 रुपयांची नाणी, स्कार्पिओ असा 7 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे सर्व आरोपी उत्तर प्रदेश मधील असून त्यांनी आंध्रप्रदेश, तामिळनाडू, बेळगाव येथील सीबीआय बँकेत दरोडा टाकला होता. तर कोल्हापुरातील कळे इथल्या बँकेतही दरोडा टाकला होता. या चोरीचा तपास सुरू असताना ही टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. बँक चोरीत कुख्यात असलेली ही टोळी बँकांच्या स्ट्रॉंग रूमची टेहळणी करून टार्गेट करत होती. या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -