दयाबेनच्या भूमिकेत दिसणार दिव्यांका त्रिपाठी? अभिनेत्रीनं केला खुलासा

दयाबेनच्या भूमिकेत दिसणार दिव्यांका त्रिपाठी? अभिनेत्रीनं केला खुलासा
- Advertisement -


हायलाइट्स:

  • दिव्यांका त्रिपाठीला ऑफर झाली आहे दयाबेनची भूमिका
  • अभिनेत्रीने सांगितलं भूमिकेबद्दलचं सत्य
  • दिव्यांका लवकरच दिसणार ‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये

मुंबई– छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. दिव्यांकाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. पुन्हा एकदा दिव्यांकाला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. त्यामुळेच की काय दिव्यांका लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ मध्ये दयाबेनचं पात्र साकारणार असल्याच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. दिव्यांकाला दयाबेनची भूमिका ऑफर झाल्याची बातमी अनेक वेबसाइटकडून देण्यात आली आहे. परंतु, दिव्यांकाने मात्र या सगळ्या अफवा असल्याचं म्हणत चाहत्यांचा भ्रमनिरास केला आहे.

‘शोले सिनेमात तीन शब्दांसाठी सांभा पात्राचा जन्म झालेला’

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील दयाबेनचं पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी हिने २०१७ साली गरोदरपणामुळे मालिकेतून ब्रेक घेतला होता. परंतु, आता चार वर्ष उलटूनही दिशा कार्यक्रमात परत येण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. निर्माते दिशाच्या येण्याची वाट पाहत आहेत. परंतु, दयाबेनच्या पात्रासाठी दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरू असल्याच्या बातम्या देखील कानावर येत असतात. अशातच, दिव्यांकाला ही भूमिका ऑफर झाल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, या चर्चा केवळ अफवा असल्याचं सांगत दिव्यांका म्हणाली, ‘हो, ती मालिका खूप सुंदर आहे. मालिकेचा प्रेक्षकवर्ग देखील प्रचंड मोठा आहे. परंतु, मला नाही वाटत की मी दयाबेनची भूमिका करण्यासाठी उत्सुक आहे. मी एका वेगळ्या आणि हटके भूमिकेच्या शोधात आहे. ज्यात मला नवीन काहीतरी करता येईल.’

दिव्यांकाने या सगळ्या अफवा असल्याचं सांगितल्याने चाहत्यांच्या उत्साहावर पाणी पडलं आहे. गेली अनेक वर्ष प्रेक्षक दयाबेनच्या कार्यक्रमात परत येण्याची वाट पाहत आहेत. परंतु, आताही त्यांच्या पदरी निराशाच पडणार आहे. दिव्यांकाने नुकतीच ‘खतरों के खिलाडी ११‘ चं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. लवकरच प्रेक्षकांना दिव्यांका ‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये दिसणार आहे. भारतात परतल्यावर दिव्यांकाने एक खास फोटोशूटही केलं आहे. दिव्यांकाच्या फोटोंची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.

‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये राहुल वैद्यला मिळतंय सगळ्यात जास्त मानधन? जाणून घ्या किती आहे रक्कम
जेठालाल की शाहरुख? ‘रईस’ चा मजेशीर व्हिडीओ झाला व्हायरल

संसारिक वाद आणि अॅब्ज, श्वेता तिवारी नेहमीच असते चर्चेत; आता अर्जुन बिजलानीनंही विचारला प्रश्न



Source link

- Advertisement -