Home बातम्या व्यवसाय दरवाढीचा आणखी एक दणका ; सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

दरवाढीचा आणखी एक दणका ; सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

0
दरवाढीचा आणखी एक दणका ; सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

[ad_1]

हायलाइट्स:

  • पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे.
  • आज पेट्रोल १९ पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी महागले आहे.
  • यापूर्वी मंगळवारी १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती.

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. आज पेट्रोल १९ पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी महागले आहे. यापूर्वी मंगळवारी १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती.

करोना संकटात दिलासा; ‘रिलायन्स’ देणार दोन लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना बोनस
आजच्या दरवाढीने मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९७.१२ रुपये झाला आहे. तर दिल्लीत पेट्रोल ९०.७४ रुपये झाले आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९२.७० रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९०.९२ रुपये झाला आहे.

करोनाबाबत गाफीलपणा नडला; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची केंद्रावर कठोर टीका म्हणाले…
पेट्रोलप्रमाणेच आज डिझेलच्या दरात देखील सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ८८.१९ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८१.१२ रुपये झाला आहे. चेन्नईत डिझेल ८६.०९ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८३.९८ रुपये प्रती लीटर झाले आहे.

सोनं झालं स्वस्त ; देशव्यापी लॉकडाउनच्या भीतीने सोन्याचे भाव गडगडले
निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा २६ फेब्रुवारी रोजी केली होती. त्यानंतर पेट्रोलियम कंपनहानी २७ फेब्रुवारी २०२१ रोजी डिझेल दरात १७ पैशांची वाढ केली होती. त्यानंतर दरवाढ झाली नाही. तर मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात डिझेल दरात चार वेळा कपात झाली. यात डिझेल ७४ पैशांनी स्वस्त झाले होते.

जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मात्र तेजी दिसून आली आहे. कच्च्या तेलाचा भाव सात दिवसांच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. अमेरिकन कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडच्या दरात २.०९ डॉलरची वाढ झली. तेलाचा भाव ६४.४९ डॉलर प्रती बॅरल झाला. तर यूएस टेक्सासमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.७० डॉलरने वधारला आहे. तो ६६.२८ डॉलर प्रती बॅरल झाला.

[ad_2]

Source link