Home ताज्या बातम्या दापोली येथे पुण्यातील परवानाधारक सुरक्षा रक्षक संस्थेचे पहिले चर्चासत्र पार पडले

दापोली येथे पुण्यातील परवानाधारक सुरक्षा रक्षक संस्थेचे पहिले चर्चासत्र पार पडले

0

पुणे : परवेज शेख दिनांक २८/२९ सप्टेम्बर रोजी दोन दिवशीय चर्चासत्र मोठ्या उत्साहात पार पडले, या चर्चासत्राला मोठ्या प्रमाणावर सुरक्षा विषयक प्रश्नावर व्याख्याने आणि वेगवेगळ्या बैठका झाल्या.

ग्लोबल रिपोर्ट च्या दाव्यानुसार भारतामध्ये हैद्राबाद आणि पुणे ही दोन शहरे सर्वात सुरक्षित आहेत तर जगात १४३ वे स्थानावर आहे आणि क्वालिटी ऑफ लिविंग इंडेक्स २०१९ व ईज ऑफ लिविंग इंडेक्स (जीवन सुगमता सूचकांक) याच्या सर्व्हे नुसार पुणे हे सामाजिक,संस्थागत,आर्थिक आणि शारीरिक या आधारावर सर्वोच्च स्थानावर आहे.


पुणे शहरात सेफ्टी और सिक्युरिटी करण्यात जवळपास १३०० हुन अधिक सुरक्षा रक्षक संस्था मोठ्या प्रमाणावर कामकाज पाहतात त्यात मा. पोलीस आयुक्त, डॉ . के. वेंकटेशम (भापोसे), मा. पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे (भापोसे), मा. अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) अशोक मोराळे (भापोसे), (भापोसे), मा. अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. संजय शिंदे (भापोसे), मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलीस व खाजगी सुरक्षा रक्षक संस्था यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम पी-४ हा कार्यक्रम आयोजित करून करून पुणे शहरा तील खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेना जोडून काही नव्याने प्रयोग करून अधिक मोठ्या आणि सक्षम पद्धतीने अधिक सुरक्षित करण्यावर भर दिला आहे.

इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस यूनिट यांच्या यादीत या वर्षी पुण्याचे नाव येण्यासाठी प्रत्येक पुणेकरांची जबाबदारी आहे म्हणून खाजगी सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणावर सर्वच क्षेत्रात सुक्ष्म पद्धतीने काम करते याचा विचार करून शहरातील गृहनिर्माण हौसिंग सोसायटी, मॉल, हॉटेल अँड रेस्टोरंट-पब, सर्व प्रकारची दुकाने, आय टी कंपनी, खाजगी बंगले, बँक- ए. टी. एम, सर्व प्रकारची ऑफिस, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, उद्याने, सार्वजनिक पे अँड पार्क पार्किंग, कॉमेर्सिअल कॉम्प्लेक्स, ज्वेलरी शॉप, बिग बाजार, डी मार्ट, सिनेमा गृह, शासकीय निमशासकीय संस्था, सरकारी कार्यालय, कारखाने, औद्योगिक वसाहत, विविध बाजारपेठ इ. ठिकाणी खाजगी सुरक्षा कर्मचारी सुरक्षा रक्षक काम करतात त्यांचे योग्य ती व्यवस्थित प्रणाली जर विकसित केली तर डिजिटल सिक्योरिटी,हेल्थ सिक्योरिटी,इंफ्रास्ट्रक्चर सिक्योरिटी,पर्सनल सिक्योरिटी यात खाजगी सुरक्षा रक्षक संस्था खारीचा वाटा घेऊन पुणे शहराला इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस यूनिट मध्ये स्थान निर्माण होऊ शकते म्हणून झालेल्या चर्चासत्रातून पुणे गुन्हे मुक्त करण्यासाठी एक पाऊल पुढे खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेच्या ५० मालकांनी टाकले. पुण्यात काम करताना या पुढे गुन्ह्याचे प्रमाण रोखण्यास मदत करणार आणि वेळोवेळी पोलीस प्रशासनाला मनुष्यबळ सुरक्षा रक्षक संस्थेचा वतीने देण्यात येणार आहे .


सुरक्षा रक्षक संस्थेचे मालक हे शासनाचा नियमा प्रमाणे काम करताना जनतेची सेवा करतील आणि आपत्कालीन व्यवस्थेमधे आम्ही पोलिस प्रशासनाचा पाठीशी खंबीर पुणे उभे राहणार आहोत असे बैठकीतून निष्कर्ष झाला आहे.


मोटिवेशनल व्याखाने आणि विविध विषयावर कार्यशाळा आयोजित केल्या त्यात गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, विशेष सुरक्षा पुरविण्याच्या कामी चर्चा घडवून आल्या तसेच येणाऱ्या विधानसभेला आणि आपत्ती काळात पुणे शहरात सुरक्षा रक्षक हे पोलीस प्रशासनासोबत मदतनीस म्हणून खासदुत तर मालक विशेष पोलीस दूत म्हणून स्वयंसेवक पद्धतीने कामकाज पाहतील.

या कार्यशाळेला आणि चर्चासत्राला डी.खलिपे (Legal advisor) यांचे मोटिवेशन स्पीच अँड गव्हर्नमेंट कॉम्पलिअन्स, मा.भक्ती वाघ मॅडम (टॅक्स कोड) यांचे टॅक्सेस संदर्भात प्रॅक्टिकल वर्क शॉप आणि मा.संदीप साकोरे सर (Director -Brillient HR solutions) हे गव्हर्मेंट नियमावली आणि त्यांच्या संदर्भातील माहिती यावर मार्गदर्शन झाले विशेष म्हणजे सायबर क्राईम यावर मा. जयंत सातकर (मॅग्नेटिव्हिटी सोल्युशन्स प्रा. ली पुणे) यांनीही कार्यशाळेला मोलाचे मार्गदर्शन केले.

पुण्यातील सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या पैकी नामांकित ५० संस्थेनी सहभाग नोंदवला त्यात खास करून मे.भारत शिल्ड फोर्स प्रा.ली पुणे, मे. भोसले ग्रुप, पुणे, मे. राज सिक्युरिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा.लि., पुणे, मे. गुरमीतसिंग गिल सिक्युरिटी एजन्सी, पुणे, मे. ब्लॅक कॅट सिक्युरिटी सर्व्हिसेस, पुणे,
मे. एस एम ग्रुप, पुणे,
मे. ओम सिक्युरिटी सर्व्हिसेस, पुणे,
मे. एम बी आर एन्टरप्राइसेस प्रा. लि., पुणे,
मे. प्रोटेक्ट शिल्ड फोर्स, पुणे,
मे. प्रसन्ना सिक्युरिटी सर्व्हिसेस, पुणे,
मे. अशोक फॅसिलिटी सर्व्हिसेस, पुणे,
मे. आर ३ एस सिक्युरिटी, पुणे,
मे. धन-प्रगती सिक्युरिटी, पुणे,
मे. एस के सर्विसेस, पुणे,
मे. ओम साई सेफगार्ड सर्व्हिसेस, पुणे,
मे. एस. जे. फॅसिलिटी मॅनेजमेंट, पुणे,
मे. सनराईस सिक्युरिटी एजन्सी, पुणे,
मे. स्वामी समर्थ एन्टरप्रायझेस, पुणे,
मे. डी के ग्रुप मॅनपावर सर्व्हिसेस, पुणे,
मे. आर व्ही ग्रुप सपोर्ट सर्व्हिसेस, पुणे,
मे. चिराग इंडस्ट्रीज़ सर्व्हिसेस, पुणे,
मे. रिलायबल एच आर फॅसिलिटी पुणे,
फर्स्ट डिफेन्स फोर्स पुणे, मे. परफेक्ट प्रोटेक्शन सेक्युरिटी सर्विसेस सातारा,
मे. एम बी आर एन्टरप्राइसेस प्रा. लि., पुणे,
मे. साई सिक्युरिटी फोर्स …इत्यादी संस्थेचा मोठा वाटा होता.
मान्यवरांचे आणि सहभागी संस्थेचे सत्कार करून त्यांना सन्मान चिन्हे देण्यात आली.
पी-४ चे समन्वयक मा.सचिन मोरे भारत शिल्ड फोर्स (संस्थापक) यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.