Home गुन्हा दारूविक्रेत्याचा महिला व मुलीवर जीवघेणा हल्ला, वर्ध्यातील घटना

दारूविक्रेत्याचा महिला व मुलीवर जीवघेणा हल्ला, वर्ध्यातील घटना

0

वर्धा : जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात दारू विक्रेत्यांची अरेरावी चांगलीच वाढली आहे. शहरातील शास्त्री वार्ड परिसरातील दारूविक्रेत्याने एका महिला व मुलीवर जिवघेणा हल्ला करत जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. जखमी महिलेचे नाव संगीता राजू राऊत तर मुलीचे नाव नेहा राजू राऊत व स्वाती राजू राऊत आहे. तर आरोपी दारू विक्रेत्याचे नाव संतोष राऊत असे आहे. जखमीवर हिंगणघाट येथिल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

संतोष राऊत हा शहरात गेल्या 10 ते 15 वर्षांपासून दारूविक्रीचा व्यवसाय करत असल्याने त्याच्या या दारूविक्रीने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कुणी जर संतोष राऊत याच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे धाडस दाखवले तर तो त्यांना गंभीर पणे मारहाण करतो. तसेच मागील कित्येक वर्षांपासून मी हा व्यवसाय करतो आणि माझे पोलिसांसोबत हितसंबंध आहे माझे कुणीच काहीही बिघडवू शकत नाही अशी दटावून सांगतो. या हल्ल्याचे धाडस झालेच कसे अशी चर्चा हिंगणघाट शहरात सुरू आहे. पोलिसांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढवल्या जात आहे. या प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या राऊत कुटूंब दारूबंदीच्या मागणीसाठी वर्धा पोलीस अधीक्षक यांना तक्रार देऊन दारूबंदीची मागणी करणार आहे.