दारूसाठी पैसे मागणाऱ्या मुलाचा वडिलांनीच केला खून

- Advertisement -

कोल्हापूर : दारुसाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून शिरोळ तालुक्यातील आलास रामनगरमध्ये खुरप्याने वार करत वडिलांनीच मुलाचा खून केला. डोके व हातावर वार झाल्याने राजू उर्फ म्हैबुब बाबु मुराशे (वय 27) याचा जागीच मृत्यू झाला. वडील बाबू म्हैबुब मुराशे (वय 55) यांना कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बाबू मुराशे व त्यांचा मुलगा म्हैबुब मुराशे हे दोघे ऊसतोड मजुरीचे काम करतात. म्हैबुब याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत दोघांमध्ये वारंवार भांडण होत असे. शनिवारी (दि 2) रात्री 10.30 च्या सुमारास म्हैबुब याने वडीलांकडे दारूसाठी पैशाची मागणी करत होता. यातून त्यांचा वाद विकोपाला गेला. या रागातून दोघांनी घरासमोरील अंगणात ऊस तोडणीचे खुरपे घेऊन एकमेकांना मारण्यास सुरवात केली.

म्हैबुबने वडिलांच्या डोक्यात खुरप्याने वार केल्याने ते जखमी झाले. त्यावेळी वडिल बाबू यांनीही मुलग्याच्या डोके व हातावर खुरप्याने जोरात वार केला. यामध्ये वर्मी घाव बसल्याने म्हैबुब रक्तबंबाळ झाला. हे भांडण सोडवण्यासाठी संशयित आरोपी बाबूची पत्नी रजिया हिने शेजारील लोकांना बोलवले. त्यानंतर रजिया यांनी कुरुंदवाड पोलिसांत या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाययक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

- Advertisement -